आमची लढाई सीएए विरोधात

caa nrc Against women protest in Aurangabad
caa nrc Against women protest in Aurangabad

औरंगाबाद : राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या सीएए, एनआरसी कायद्याबाबत देशभरात विरोधी लाट उठली आहे. औरंगाबादेतही रविवारी (ता. 19) मुस्लिम समाजातील महिलांनी या कायद्याविरोधात  विभागीय आयुक्‍तालया समोर धरणे आंदोलन केले. 

सीएए आणि एनआरसी विरोधात पहिल्यांदाच शहरात महिलांचे स्वतंत्र धरणे आंदोलन झाले. या कायद्याविरोधात महिलांनी आपला रोष व्यक्‍त केला. या धरणे आंदोलनात शहरातील विविध भागातील महिलांनी सहभाग नोंदविला. हातात सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील बोर्डासह तिरंगा आणि काळ्या रंगाचे निषेधाचे झेंडे घेऊन विविध भागातून मोठ्या संख्येने महिला दिल्ली गेट येथे पोचल्या होत्या. या आंदोलनात सईदा नसरीन, सय्यदा सबा, मुब्बशिरा फिरदौस, इशरत हाशमी, शबाना आयमी, फहीमा अल निसा बेगम, प्रा. सुषमा फिरदौस, तसेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य प्रा. मोहनिस बुशरा अबदी.सुषमा अंधारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

"इन्कलाब जिंदाबाद'च्या घोषणाही 

"इन्कलाब जिंदाबाद', "हमे चाहिए आजादी'च्या घोषणाही या आंदोलनात देण्यात आल्या. या आंदोलनात महिलांसोबत लहान मुलांनीही सहभाग नोंदविला. महिलांच्या या आंदोलनामुळे दिल्ली गेट ते अण्णा भाऊ साठे चौकपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला होता. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीच्या नियोजनासाठी आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या तरुणांनी पोलिसांची मदत केली. या आंदोलनात आलेल्या महिलांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या धरणे आंदोलनात उपस्थितीत मान्यवर महिलांनी सीएए हा कायदा मुस्लिम सह जनतेच्या विरोधातील असल्याचे मत व्यक्त केले. राज्य घटनेच्या मुलभूत कलमाच्या विरोधात हा कायदा असल्याचेही मत मान्यवरांनी व्यक्त केले. 

मोदीच्या चहात साखरच नाही 
धरणे आंदोलनात इशरत हाशमी म्हणाल्या, सीएए, एनआरसी, विविध कायदे आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायदे रूपी चहा बनवताना चहापत्ती टाकली; मात्र त्यात साखर टाकणेच विसरले. ही साखर म्हणजेच मुस्लिम समाज आहे. साखरे शिवाय चहा कसा होईल. त्यामुळे मुस्लिम समाजाशिवाय देश पूर्ण होणार नसल्याचे आपल्या भाषणात इशरत हाशमी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com