प्रचार थांबला, पदवीधरसाठी उद्या मतदान 

निवडणूक.jpg
निवडणूक.jpg

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय नऊपैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे. 
औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे.

उमेदवारांनी प्रचार करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. मंगळवारी (ता. एक) आठ जिल्ह्यात ११५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 


मतदानाला जाताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खासगी औद्योगिक क्षेत्र यांच्याकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 


छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारास वरील नऊ पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे १० नोव्हेंबर २०२० चे मुळ आदेश अंतिम राहतील, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळवण्यात आले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com