Corona केंद्रीय पथकाची सूचना कोरोनाची भीती दूर करा 

औरंगाबाद ः पुंडलीनगर भागात पाहणी केल्यानंतर माहिती घेतना कुणाल कुमार. सोबत आस्तिककुमार पांडेय, सोहम वायाळ, नीता पाडळकर, प्रमोद राठोड.
औरंगाबाद ः पुंडलीनगर भागात पाहणी केल्यानंतर माहिती घेतना कुणाल कुमार. सोबत आस्तिककुमार पांडेय, सोहम वायाळ, नीता पाडळकर, प्रमोद राठोड.

औरंगाबाद : कोरोना विषाणूची नागरिकांमध्ये एवढी भीती आहे की, लक्षणे असले तरी अनेक जण समोर येण्यास तयार नसतात. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास दहा दिवस कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागेल. आपल्याला चांगले उपचार, जेवण मिळेल की नाही? असे अनेक प्रश्‍न नागरिकांच्या मनात आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्या नागरिकांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करत नागरिकांच्या मनातील भीती दूर करा, अशा सूचना केंद्रीय समितीचे प्रमुख कुणाल कुमार यांनी शनिवारी (ता. २५) महापालिकेला केल्या. 

केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी पुंडलिक नगर, हनुमान नगर येथील कंन्टेनमेंट झोन व रिलायन्स मॉल येथील कोरोना चाचणी शिबिराची पाहणी केली. यावेळी समन्वय अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले की, कंन्टेनमेंट झोनमध्ये ८०० घरे असून, सुमारे ३५ हजार नागरिक राहतात. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गस्तीपथकांच्या मदतीने कोणी बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा व्यक्ती आत येणार नाही, याची दखल घेतली जात आहे. त्यावर कुणाल कुमार यांनी नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी कोरोनावर मात करून आलेल्या रुग्णांना त्याच्या घेऊन जा. त्यांचे अनुभव नागरिकांना सांगा, अशा सूचना केल्या. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

 यावेळी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, पुंडलीकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, स्मार्ट सिटीचे पुष्कल शिवम्, वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, भाजपचे माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

व्हॅन्टीलेटरची संख्या वाढवा 

भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी कुणाल कुमार यांची भेट घेत खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. व्हॅन्टीलेटरची संख्या देखील कमी आहे, ती वाढविण्याची मागणी केली. 

अ‍ॅन्टीजेन टेस्टची संख्या वाढवा 

यानंतर कोणाचा कोरोनामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे. रुग्णांचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. त्यासाठी ऑक्सिमिटरद्वारे नियमित तपासणी करा. अ‍ॅन्टीजेन टेस्टिंगची संख्या आणखी वाढवा, अशा सूचना कुणाल कुमार यांनी केल्या. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

(संपादन : मधुकर कांबळे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com