Coronavirus : चिकलठाण्यातील फार्मा कंपनीत कोरोनाचा शिरकाव, २० कामगारांना झाली लागण

corona.jpg
corona.jpg

औरंगाबाद : वाळूज, शेंद्रा येथील एमआयडीसीतील काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता चिकलठाणा एमआयडीसीतील एका औषधनिर्मिती करणाऱ्या नामांकित कंपनीतही तब्बल २० जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटव्ह आला आहे.

मागील महिन्यात याच कंपनीत दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कंपनी मंगळवारपासून (ता. १४) पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या कंपनीचे उत्पादन निर्यात केले जाते. चिकलठाणा एमआयडीसीतील ही जुनी कंपनी असून, येथे हजारो कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. या कंपनीत २० जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कंपनीतर्फे तीन दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहितीही सूत्रांनी दिला आहे. मंगळवारी ही कंपनी बंद होती. दुपारी चारच्या दरम्यान कंपनीत एक रुग्णवाहिका गेली. दिवसभर काम बंद ठेवण्यात आले होते, असे त्या कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

प्रशासन म्हणते, कंपनी सुरू राहणार 
याबाबत कंपनी प्रशासनाच्या एचआर विभागात विचारणा केली असता कंपनी सुरू आहे; बुधवारीही (ता. १५) कंपनी सुरू राहणार असल्याचे संबंधिताने सांगितले. दरम्याम, कोरोनाची किती लोकांना लागण झाली आहे, या प्रश्नावर आम्ही काहीच सांगू शकत नसल्याचेही म्हणत अधिक माहिती देणे टाळले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com