एकाच नाळेवर होते जुळे ! गुंतागुंतीच्या प्रसुतीत बाळाला जीवदान

manoj bala 000.jpg
manoj bala 000.jpg

औरंगाबाद : जुळे बाळ असले की प्रसुती गुंतागुंतची असते. त्यामुळे दाम्पत्याची चिंता वाढते, त्यातच दोन्ही बाळ एकाच नाळेवर (प्लॉसेंटा) असतील, तेव्हा बाळाला जास्त धोका असतो. परंतू डॉक्टर व रुग्णातील विश्‍वासाच्या नात्याची ‘नाळ’ पक्की होती. त्याला अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड अर्थातच ‘फिटोस्कोपिक सर्जरी’चा अवलंब करुन लाईफ हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रगती शिरपेवार यांच्या उपचारांनी या दाम्पत्याच्या जीवनात आनंद प्रसवला.


साधारणतः दहा हजारातून एक ते तीन गर्भधारणा अशा प्रकारची असते. त्यातील १० ते १५ टक्क्यांमध्ये खुपच अवघड गुंतागुंत असते. या प्रसुतीमध्ये ३० टक्के परिणाम येतो. डॉ. शिरपेवार यांच्याकडे कुलदीप व शिल्पा गायकवाड यांची अशीच केस आली. त्यांचे गर्भधारणेसाठीही उपचार सुरु होते. यादरम्यान नैसर्गिक गर्भधारणा राहीली. पण सोनाग्राफीचा अहवाल आल्यानंतर त्यातून (मोनोकोरीयानिक प्रेग्नन्सी) जुळे बाळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या दाम्पत्याची चिंता वाढली. परंतू डॉ. शिरपेवार यांनी त्यांचे समुपदेशन करुन विश्‍वास दिला. त्यानंतर डॉ. शिरपेवार यांनी या केसमध्ये पुढे जायचे ठरविले. पण १६ आठवड्यात समस्या सुरु झाल्या. एक बाळ चांगले वाढत होते पण दुसऱ्या बाळाची वाढ अत्यंत कमी होती व त्याच्या भोवतालचे गर्भजलही कमी झाले होते. विशेषतः रक्तपुरवठ्यातही अडथळा येत होता.

या समस्येला वैद्यकीय भाषेत टीटीटीएस असे म्हणतात. या अवस्थेत तीन दिवसाला गर्भाची सोनोग्राफी करणे आवश्‍यक असते. जर बाळ चौथ्या स्टेजमध्ये गेले असते तर दोन्ही बाळ गमविण्याची भीती होती. त्यामुळे दर तीन दिवसांना सोनोग्राफी करुन बाळाच्या सर्व अवस्था जाणुन घेत पुढील दिशा व उपचार ठरविले जात होते. या बाळांची नाळ पोटात असतानाच कट करावी लागेल असा पर्याय डॉ. शिरपेवार यांनी गायकवाड दाम्पत्यापुढे पर्याय ठेवला. गर्भातील बाळावरील शस्त्रक्रियेत डॉ. अजित पाटील यांनी डॉ. शिरपेवार यांनी मदत केली. तो काळ लॉकडाऊनचा होता. पण डॉक्टरांमुळे नंतर बाळाचा गर्भातील प्रवास सुस्थितीत सुरु झाला. या सर्व प्रक्रीयेसाठी डॉ. राहूल शिरपेवार, डॉ. अजित पाटील, डॉ. अनुप चलवदे, डॉ. अमोल इटोलीकर, डॉ. शिल्पा सातारकर यांच्यासह टीमचे मोठे योगदान होते.

आईला मिळवुन दिले ममत्व
नवव्या महिण्यातही गर्भातील पाणी कमी होणे सुरु झाले त्यामुळे ३७ व्या आठवड्यात ‘सिझर’द्वारे प्रसुती करण्यात आली. बाळाची प्रकृती उत्तम असुन त्याला ‘एनआयसीयु’मध्ये ठेवण्याचीही गरज भासली नाही. सहा वर्षांपुर्वी या दाम्पत्यांचे लग्न झाले अडीच वर्षांपासुन ते बाळासाठी प्रयत्नशिल होते.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com