औरंगाबाद : कोरोना महामारीत मिळेना वेळेवर पेन्शनर्सना पेन्शन 

vrudh.jpg
vrudh.jpg

औरंगाबाद : कोरोना महामारीत सर्वांचा आरोग्यविषयक खर्च वाढला आहे. त्यात जेष्ठ नागरीकांच्या नेहमीच्या वैद्यकिय खर्चात कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठीच्या खर्चाची भर पडली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या पेन्शनर्सना वेळेवर पेन्शन मिळत नसल्यामुळे फार मोठ्या अर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जिल्हा परिषदेतील अधिकाधिक पेन्शनर जेष्ठ नागरीक आहेत. त्यांना वेळोवेळी आरोग्य सुविधा तसेच अनेक आजारामुळे वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात, तर काहीं पेन्शनर्सच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह पेन्शनवरच चालतो. शरीर थकल्यामुळे पेन्शनर्स आपल्या व्यथा मांडण्यासाठी कार्यालयात जाऊ शकत नाहीत. एखादवेळी चुकून एखादा पेन्शनर कार्यालयात गेला तर त्याच्या तक्रारीची कोणी दखलही घेत नाहीत. एकंदरीत जिल्हा परिषदेच्या पेन्शनर्सची अवस्था वाईट बनली आहे.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेत पेन्शनर्सना दर महिन्याच्या एक तारखेला पेन्शन मिळावे, त्यांच्या पेन्शनविषयक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी पेन्शन सेल सुरू करण्यात आला आहे. परंतू त्याचा पेन्शनर्ससाठी काही फायदा होत नाही. या सेलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पेन्शनर्सना सहकार्य होत नसल्याची तक्रार पेन्शनर्सकडून करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून तर अजिबात सहकार्य मिळत नसल्याचे निवृत्त शिक्षकांनी सांगीतले. 
गेल्या मार्चपासून कोरोना विषाणुमुळे आलेल्या संकटामुळे मार्चपासून सर्वजण भयभीत झाले आहेत. जेष्ठ नागरीकांचा वयोमानानुसार वैद्यकिय खर्च वाढलेला असतो, त्यात कोरोनाचा धोका पन्नाशी पार केलेल्यांना अधिक वाढला आहे. यासाठी कोरोनापासून दूर राहण्यासाठी सॅनिटायझर, मास्क, ग्लोजचा अतिरिक्त खर्च वाढला आहे, असे असताना पेन्शन वेळेवर मिळत नाही.
ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस म्हणाले, गेल्या चार महिन्यापासून पेन्शन वेळेवर मिळत नाही. हातात पेन्शन पडण्यासाठी दरवेळी २० तारीख उजाडत आहे. निवृत्त शिक्षकांना तर मे महिन्याचे पेन्शन २१ जून रोजी मिळाले. अशा कठीन परिस्थितीत पेन्शनरना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. दुसऱ्यांवर आश्रीतासारखे रहावे लागत आहे.

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून पेन्शनर्सना त्यांच्या बॅंक खात्यात न चुकता एक तारखेला पेन्शन जमा होत असते. जिल्हा कोषागार कार्यालयाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या पेन्शनर्सना दर महिन्याच्या एक तारखेलाच पेन्शन मिळेल असे नियोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com