शेतामुळे लांब राहिला कोरोना तो कसा वाचा सविस्तर

शेतामुळे लांब राहिला कोरोना तो कसा वाचा सविस्तर


औरंगाबादः सुरक्षित अंतर, काम असेल तरच बाहेर पडणे, बाहेर पडल्यानंतर गर्दीत न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे असे नियम पाळल्यास कोरोनाला चार हात लांब ठेवणे सहज शक्य आहे. हे करून दाखविले आहे ते कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पळशी शहर (ता. औरंगाबाद) गावाने. अनेक ग्रामस्थ शेतातच राहायला गेल्याने त्यांचा इतरांशी संपर्क कमी झाला. परिणामी, कोरोना लांब राहिला.

पळशी गावात १४ जूनला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. तपासणीनंतर मूळ गावातील तब्बल २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यानंतर पळशी गावातील बहुतांश जणांनी शेतात राहण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व दुकाने, व्यवहार बंद ठेवल्याने सर्व २२ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या तरी पळशी गाव कोरोनामुक्त झाले. गाव कोरोनामुक्त होण्यामध्ये शेताचा वाटा खूप मोठा आहे.

औरंगाबाद शहरापासून जवळच असल्याने पळशी गावातील लोकांचा अनेकांशी संपर्क येतो; तसेच आजूबाजूच्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे बँका, दवाखाने, दुकाने आहेत. त्यामुळे अनेकांचे येणे-जाणे असते. २५ जूननंतर गावात एकही रुग्ण आढळून आला नाही. तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांवर भालगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.

सकाळी आणि सायंकाळी फक्त गोळ्यांनीच हे रुग्ण बरे झाले. त्यांची येथे अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, २० रुग्ण बरे होऊन घरी परतले. उर्वरित दोन रुग्णांची शनिवारी (ता. चार) सुटी झाली झाल्याने पळशी गाव सध्या कोरोनामुक्त झाले आहे. 

वर्षभराच्या चिमुकल्यासह ८५ वर्षांचे आजोबा बरे

पळशी गावात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये एक वर्षाच्या लहान मुलापासून तर ८५ वर्षांच्या आजोबांपर्यंतचा समावेश होता. लहान मुलगा आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोना झाल्याने गावात भीतीचे वातावरण होते. ते बरे होऊन जेव्हा घरी आले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. 

भाजीपाल्यामुळे अनेकांचा संपर्क

पळशी शहर गावात भाजीपाल्याचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यामुळे अनेक शेतकरी हे भाजीपाला विक्रीसाठी मार्केटमध्ये येतात. त्यांचा अनेकांची संपर्क येत असतो. शिवाय अनेकजण दूध विक्री करतात. त्यामुळे आता सर्वांनी कोरोनाला लांब ठेवण्यासाठी नियम पाळावेत, काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com