esakal | जाताना ते म्हणाले, ‘मॅडम तुमको शादी में बुलायेंगे’ 
sakal

बोलून बातमी शोधा

ockdown.jpg

भावुक होत मध्यप्रदेशातील या नागरिकांनी गुरुवारी (ता. सात) दुपारी निवारागृह सोडले. काही तरुणांनी महापालिकेच्या सहायक आयुक्त विजया घाडगे यांच्यासोबत सेल्फी घेत, ‘मॅडम आपने हमारा बहुत ख्याल रखा. तुमको भुलेंगे नहीं, शादी में बुलायेंगे,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. 

जाताना ते म्हणाले, ‘मॅडम तुमको शादी में बुलायेंगे’ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून शहरात अडकून पडलेल्या १५९ पैकी २८ मजूर, कामगारांची अखेर सुटका झाली. भावुक होत मध्यप्रदेशातील या नागरिकांनी गुरुवारी (ता. सात) दुपारी निवारागृह सोडले. काही तरुणांनी महापालिकेच्या सहायक आयुक्त विजया घाडगे यांच्यासोबत सेल्फी घेत, ‘मॅडम आपने हमारा बहुत ख्याल रखा. तुमको भुलेंगे नहीं, शादी में बुलायेंगे,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. 

लॉकडाउननंतर देशभर अडकून पडलेल्या मजूर, कामगार नागरिकांचा प्रश्‍न गंभीर बनला होता. राज्य शासनाच्या आदेशानंतर शहरात अडकून पडलेल्या १५९ नागरिकांची सोय निवारागृहात करण्यात आली होती. सिडको एन-सात, सिडको एन-सहा, गारखेडा, जवाहर कॉलनी, ज्युबली पार्क या शाळांमध्ये हे नागरिक होते. ५४ जण मध्यप्रदेशातील, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांतील मिळून वीसजण तसेच यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली आदी भागांतील सुमारे सत्तर जणांचा यात समावेश आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या नागरिकांची महापालिकेच्या सहायक आयुक्त घाडगे व्यवस्था पाहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून हे नागरिक गावी जाण्यासाठी आतुर होते. त्यांची समजूत काढणे, मनोरंजनासाठी व्यवस्था करणे, अनेकांसोबत असलेल्या लहान मुलांना घरून दूध देणे, वेळप्रसंगी नागरिकांच्या गावांकडील नातेवाइकांना समजावून सांगणे, अशी कामे घाडगे यांनी केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, या नागरिकांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला व गुरुवारी मध्यप्रदेशातील २८ जणांना सोडण्यात आले. निवारागृह सोडताना अनेक जण भावुक झाले. ‘मॅडम, आपने हमारा बहुत ख्याल रखा. तुमको भुलेंगे नही, शादी में बुलायेंगे,’ अशा शब्दांत काहींनी भावना व्यक्त केल्या. अनेकांनी घाडगे यांच्यासोबत सेल्फी घेतली. घाडगे यांनी रेल्वेस्टेशनपर्यंत जाऊन निरोप दिला. 

राज्यातील नागरिकांचा प्रश्‍न मिटेना 
शहरात अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये राज्यातील अनेकांचा समावेश आहे. या नागरिकांना बसने सोडले जाणार आहे. मात्र, वाहकांची अडचण असल्यामुळे बसचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, शुक्रवारी (ता. आठ) मध्यप्रदेशातील आणखी २६ जणांना रेल्वेने पाठविले जाणार असल्याचे विजया घाडगे यांनी सांगितले.