Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

स्क्रीनिंगनंतर एवढे प्रवासी निघाले कोरोना संशयित

औरंगाबाद : लॉकडाउन असताना शहरात दररोज तब्बल नऊ ते दहा हजार जण प्रवेश करत असल्यामुळे हा वादाचा विषय ठरला होता. त्यात राज्य शासनाने लॉकडाउन शिथिल करून प्रवासाची मुभा दिली असल्यामुळे पुन्हा एकदा शहरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महापालिकेने शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर आतापर्यंत चार लाख २१ हजार जणांची स्क्रीनिंग केली आहे. त्यातून १०९ जण कोरोना संशयित असल्याचे आढळले आहे. 

शहरात महिला प्राध्यापिका कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरात दाखल होणाऱ्या विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक या शहरांतून येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी स्क्रीनिंग सेंटर सुरू केले होते. सुरवातीला रोज सरासरी नऊ ते १० हजार नागरिक शहरात दाखल होत होते. त्यात जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणारे, दूधविक्रेते, पोलिसांची परवानगी घेऊन आलेल्यांचा समावेश होता; मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला, की प्रशासनाला उपाययोजना करताना नाकीनऊ आले.

त्यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान, लॉकडाउनची अंमलबजावणीही कडक करण्यात आली. त्यामुळे शहरात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. तरीही अडीच ते तीन हजार जणांची ये-जा सुरूच होती. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाउन शिथिल करत अडकून पडलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या सात ते आठ हजार प्रवासी रोजचे शहरात दाखल होत असून, यातून काही कोरोना संशयित निघत असल्याचे महापालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होते. 

चोवीस तासांत आले साडेसात हजार प्रवासी 
महापालिकेने छावणीनगर नाका, हर्सूल टी पॉइंट, जालना रोडवरील केंब्रिज चौक या ठिकाणी स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. गेल्या चोवीस तासांत या ठिकाणी ७,४४३ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे, तर आतापर्यंत चार लाख २१ हजार २४४ जणांचे स्क्रीनिंग केले. यातील १०९ जण कोरोना संशयित आढळले. तसेच महापालिकेने सुरू केलेल्या १३ फिव्हर क्लिनिकमधून ६६, १५ धर्मादाय रुग्णालयांतून २२१ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यातील २९ जण कोरोना संशयित आढळले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com