कोरोनाला रोखण्यासाठी ठोकले ५३ लाखांचे पत्रे...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

आत्तापर्यंत तब्बल ९६५ वसाहती कोरोनाबाधित झाल्या असून, या वसाहतींमध्ये सुमारे ५३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान अनेक वसाहती कोरोनामुक्त झाल्या झाल्याने तेथील पत्रे, बल्ल्यांचा वापर नव्या वसाहतींसाठी केला जात असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी शनिवारी (ता. २७) सांगितले. 

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या गेल्या तीन महिन्यांपासून उपाय-योजना सुरू आहेत. ज्या भागात बाधित रुग्ण आढळला त्या वसाहतींमधील प्रवेश पत्रे लावून बंद केला जात आहे. आत्तापर्यंत तब्बल ९६५ वसाहती कोरोनाबाधित झाल्या असून, या वसाहतींमध्ये सुमारे ५३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान अनेक वसाहती कोरोनामुक्त झाल्या झाल्याने तेथील पत्रे, बल्ल्यांचा वापर नव्या वसाहतींसाठी केला जात असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी शनिवारी (ता. २७) सांगितले. 

शहरातील अनेक वसाहतींमध्ये रुग्णसंख्या झापट्याने वाढली होती. शासनाच्या आदेशाने या वसाहतींमधील प्रवेश इतरांसाठी बंद करण्यात आले. वसाहतीमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर पत्रे लावण्यात आली. त्यासाठी महापालिकेने पत्रे, बल्ल्या खरेदी करून प्रवेश बंद करण्याचे काम कंत्राटदारामार्फत काम करून घेतले. त्याचे दर निश्‍चित करण्यात आले होते. शहरातील कोरोनाबाधित वसाहतींची संख्या ९६५ वर पोचली आहे.

हेही वाचा- सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश

प्रत्येक ठिकाणी सरासरी चार ते पाच हजार रुपये खर्च झाला आहे. त्यानुसार पत्रे बल्ल्या व मजुरीवर सुमारे ५२ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे श्री. पानझडे यांनी पत्रकारांना सांगितले. कोरोनाबाधित वसाहत शेवटचा रुग्ण आढळल्यापासून २८ दिवस बंद ठेवण्याचा नियम आहे. सध्या अनेक वसाहती कोरोनामुक्त झाल्याने तेथील पत्रे, बल्ल्यांचा वापर निर्जंतूक करून इतर वसाहतींसाठी केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

रात्री लावलेले पत्रे सकाळी गायब 
कोरोनाबाधित वसाहतींमध्ये महापालिकेच्या उपाय-योजना, पोलिसांची गस्त सुरू असताना देखील काही ठिकाणी भंगार चोरांनी पत्र्यांवर डल्ला मारल्याचे प्रकार घडले. त्यामुळे महापालिकेला नव्याने उपाय-योजना कराव्या लागल्या. 

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

असे आहेत दर 
पत्रा-४०० रुपये 
बल्ली-५० ते १५० रुपये 
कामगारांसाठी मास्क, सॅनिटायझर- १५० रुपये 
कामगारांचे दर-५०० रुपये 
रिक्षा भाडे-७५० रुपये 
लोडींग खर्च-६३ रुपये 
रिफिटींग दर ६९.३० रुपये पर स्वेअर मिटर 
सिमेंट रस्त्यावर लागणारे रॉड ६२ रुपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad