डॉक्टरचेच कुटुंब निघाले पाॅझिटीव्ह... जाताना म्हणाले, तुमच्यामुळेच सुखरूप

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेचे शेकडो कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहेत. त्यात अनेकांना कोरोनाची लागण देखील झाली. त्यातून बरे झालेले अधिकारी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. कोरोनायोद्धा ठरलेल्या या अधिकाऱ्यांचे एका डॉक्टराने फोन करून कौतुक केले. तुमच्यामुळे माझे कुटुंब कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

सारंग सोसायटी येथील एका डॉक्टरच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांची ८१ वर्षीय आई, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतणी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. घरातील केवळ एकमेव त्यांच्या पुतणीचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अडीच महिन्यांपासून त्यांचा दवाखाना बंद ठेवला होता. लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली. पण दुदैवाने त्यांचा भाऊ, आई यांना अचानक ताप आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तत्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी केली.

सर्वांनाच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून लाळेचे नमुने घेण्यात आले. एक सदस्य वगळता कुटुंबीयांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना धक्काच बसला. दरम्यान त्यांनी उपचार घेतले व सर्वजण घरीही पोचले. त्यानंतर या डॉक्टरांनी महापालिकेचे वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांना फोन करून प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. महापालिकेच्या प्राथमिक उपचार केंद्रातील अनुभव, इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन, कोरोनाबाधित झाल्यानंतर संपर्कात आलेले डॉक्टर, कर्मचारी, प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

सारीचे आणखी १३ रुग्ण आढळले 
औरंगाबाद : सारीच्या (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एका दिवसात १३ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सारीच्या एकुण रुग्णांनाच आकडा आठशेवर गेला आहे. सारीचे आत्तापर्यंत ७९९ रूग्ण आढळले असून, त्यापैकी ७९२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. २७२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ५१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आजपर्यंत १७ बळी गेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com