त्यांचा शोध घेण्यासाठी तब्बल दीड लाख घरांचे केले सर्व्हेक्षण 

corona
corona

औरंगाबाद ः कोरोनाबाधित रुग्णांमधील ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ (एमएचएमएच) अ‍ॅप तयार केले आहे. पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले, तर ९० हजार ५० वर्षांवरील नागरिकांची अ‍ॅपमध्ये नोंद करण्यात आली आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकाराने एमएचएमएच अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपवर ५० वर्षांवरील नागरिकांची नोंदणी केली जात आहे. सुमारे एक हजार कर्मचारी घरोघरी जाऊन ५० वर्षांवरील नागरिकांचा ताप थर्मलगनच्या साहाय्याने तर ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरद्वारे तपासून अॅपवर माहिती अपलोड करत आहेत. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्यांनी तातडीने फोनद्वारे संपर्क साधून उपचार दिले जात आहेत. एका महिन्यात पथकाने दीड लाख घरांचे सर्वेक्षण केले असून, ९० हजार जणांची नोदणी करण्यात आली आहे, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सारी’चे आणखी १३ रुग्ण आढळले 
‘सारी’च्या (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एका दिवसात १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ‘सारी’च्या एकूण रुग्णांचा आकडा आठशेवर गेला आहे. ‘सारी’चे आतापर्यंत ७९९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ७९२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. २७२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ५१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत; तसेच आजपर्यंत १७ बळी गेला आहे. 

शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा बळी 
कोरोनामुळे शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा बुधवारी (ता. आठ) मृत्यू झाला. एका पाठोपाठ एक माजी नगरसेवकांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही नगरसेवक कोरोनाकाळात जनतेसाठी मदतीचे वाटप करण्याच्या कामात आघाडीवर होते. कोरोनामुळे मंगळवारी (ता. सात) उत्तमनगर बौद्धनगर वॉर्डाच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला होता. त्यात बुधवारी पडेगाव भागातील माजी नगरसेवकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते निवडून आले होते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com