esakal | लॉकडाऊन कडक पण काय सुरू, काय बंद...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

दुचाकी, खासगी पेट्रोल बंद राहतील, कोणी बाहेर पडल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिका प्रशासकांनी दिला आहे. त्यामुळे शहरात आठ दिवस शुकशुकाट राहणार आहे.

लॉकडाऊन कडक पण काय सुरू, काय बंद...वाचा सविस्तर

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल सात हजाराच्या घरात गेली आहे. बळींचा आकडा तीनशेपार झाल्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. त्‍यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी (ता. नऊ) मध्यरात्री एक वाजेपासून ते १८ जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू राहणार आहे. दुचाकी, खासगी पेट्रोल बंद राहतील, कोणी बाहेर पडल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिका प्रशासकांनी दिला आहे. त्यामुळे शहरात आठ दिवस शुकशुकाट राहणार आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी गुरूवारी यासंदर्भात आदेश काढले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त स्वॅब घेऊन टेस्ट केल्या जाणार आहेत. या काळात दुचाकीवरून प्रवास करण्यास शहरात बंदी असेल. सकाळी सहा ते आठ या वेळेत नागरिकांना दूध विक्री व वर्तमान पत्र विक्रेत्यांना मुभा असेल. फक्त सरकारी पेट्रोल पंप सुरू राहतील. बँकांसह काही आवश्यक सेवा नियमांचे पालन करण्याच्या अटीवर सुरू राहतील, असे श्री. पांडेय यांनी आदेशात नमूद केले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यांना असेल फिरण्यास मुभा 
शहर हद्दीतील न्यायालयालयीन कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, मीडिया कर्मचारी, शासकीय व केंद्र सरकारचे कर्मचारी, शासन अंगीकृत संस्थांचे कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर, नर्स, अंगणवाडी सेविका, मेडिकल शॉप व औषध निर्मिती कारखान्यांचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा. यात कृषी, बि-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचारी, महापालिका व पोलीस विभागाचे कर्मचारी, सर्वेक्षण करणारे कर्मचारी. 

या आस्थापना राहतील बंद 
किराणा दुकाने, व्यावसायिक दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग 
मैदाने, क्रीडांगणे, खुल्या जागांवर फिरण्यास बंदी. 
उपाहारगृह, लॉज, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट. 
केश कर्तनालये, सलून, मसाज पार्लर, स्पाची दुकाने. 
जाधवमंडी, जुना-नवा मोंढा, भाजीमार्केट, किरकोळ-ठोक विक्री. 
खासगी वाहने- दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, मालवाहतूक. 
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था. 
खासगी व सार्वजनिक बस सेवा. 
बांधकामे, कन्स्ट्रक्शनची कामे. 
करमणुकीची सर्व साधणे, मंगल कार्यालये, धार्मिक सभा. 
सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना, कार्यालये. 
होम डिलेव्हरी सेवा देखील बंद राहतील. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
मर्यादित निर्बंधासह या सेवा सुरू 
दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मुभा. 
खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहतील. 
सर्व रुग्णालये, त्यांच्याशी निगडीत सेवांच्या आस्थापना सुरू राहतील. 
रुग्णांना लॉकडॉनकाळात उपचाराची सेवा नाकारता येणार नाही. 
लॉकडाऊन काळात रुग्णांना सेवा नाकारल्यास रुग्णालयांवर कारवाई. 
सर्व मेडिकलची दुकाने शहरात २४ तास सुरू राहतील. 
न्यायालये, शासकीय कार्यालये शासन नियमानुसार सुरू राहतील. 
शासकीय पेट्रोलपंप केवळ सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहील. 
या शासकीय पंपांवरही केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवांना इंधन भरता येईल. 
शहरातील इतर खासगी सर्व प्रकारचे पेट्रोल व डिझेल पंप बंद राहतील. 
गॅस एजन्सी व घरपोच गॅस सेवा सुरू राहील. दुचाकीवर गॅस नेण्यास बंदी. 
शासकीय स्वस्थ धान्याची दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील. 
वर्तमानपत्र वितरण, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाची कार्यालये सुरू राहतील. 
निर्यात वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरूच राहील. 
आरबीआयच्या मान्यताप्राप्त बँका सुरच राहतील. मात्र ग्राहकांना बँकेत बंदी राहील. 
बँकांत केवळ ऑनलाइन ग्राहक सेवा, घरपोच कॅश डिलेव्हरी सेवा, एटीएम सुरू राहील.