सात हजार पॉझिटिव्ह, तीनशे बळी गेल्यानंतर केले असे नियोजन... 

corona
corona

औरंगाबाद ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी यापूर्वी तब्बल ८० दिवस लॉकडाउन घेण्यात आले. अनेक शहरांत या काळात लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली; मात्र औरंगाबाद शहरात ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशीच स्थिती होती. लाखो जणांनी शहरातून प्रवास केला, अनेक पाहुणे मुक्कामी थांबले. यातील काहींनी कोरोनाची साथ पसरवली. नागरिकांचा संपर्क रोखण्याऐवजी प्रशासन फक्त उपाययोजना करण्यात मग्न राहिले व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांवर पोचली आणि सुमारे ३४२ बळी गेले. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन नव्या लॉकडाउनसाठी जय्यत तयारी करण्यात आली. असे नियोजन पूर्वीच केले असते तर शहरात एवढा कहर झाला नसता, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत. 

शहरात मार्च महिन्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर २५ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. पुढे ८० दिवस लॉकडाउन वाढविण्यात आले. जिल्हाबंदी असताना शहरातून प्रवास करणाऱ्यांची रोजची संख्या हजारोंच्या घरात राहिली तर ५०० ते ७०० जण शहरात कामानिमित्त येत होते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव एवढ्या झपाट्याने झाला, की नागरिकांचा संपर्क तोडण्याऐवजी उपाययोजनांवरच भर देण्यात आला. प्राथमिक उपचार केंद्र, कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटर, ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणे, या ठिकाणी सेवासुविधा देण्यातच प्रशासन कोलमडून पडले. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कातून आतापर्यंत तब्बल सात हजार जणांना कोरोनाची बाधा झाली. ३४२ जणांचे बळी गेले.

त्यामुळे टीकेची झोड उठताच महापालिका, पोलिस, जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्तांनी खऱ्या अर्थाने समन्वय साधत शुक्रवारपासून (ता. १०) पुन्हा एकदा लॉकडाउन लागू केले. तोपर्यंत कोरोनाची दहशत एवढी वाढली, की नागरिकांनी स्वतःहूनच बाहेर पडणे टाळले. त्यामुळे लॉकडाउन पहिले दोन दिवस तरी यशस्वी झाले. यापूर्वीच्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यांवर असणारी वर्दळ व यावेळी असलेले सुनसान रस्ते पाहून यापूर्वीच असे नियोजन झाले असते तर कोरोनाचा एवढा कहर वाढला नसता, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ही वेळ आलीच नसती 
समीर राजूरकर (माजी नगरसेवक) ः शहराच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. त्यात मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येत आहेत. पूर्वीपासून या पद्धतीने शहरात येणाऱ्यांची तपासणी झाली असती तर शहरावर ही वेळ आलीच नसती. 

कडू गोळी म्हणून पचवा 
प्रदीप देशमुख (ज्येष्ठ विधिज्ञ) ः एप्रिल महिन्यात दुसरे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर हीच पद्धत प्रशासनाने अवलंबिली असती तर अशी वेळ आली नसती; पण चूक दुरुस्त करण्याची संधी प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे आतातरी कोरोनाची साखळी तोडून येणाऱ्या काळात नागरिकांना दिलासा देणारे निर्णय शासन-प्रशासनाने घ्यावेत. नागरिकांनी कडू गोळी म्हणून लॉकडाउनचे पालन करावे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com