आरोग्यमंत्र्यांनी सांगितले पण महापालिकेने केेले नेमके उलटे... 

corona
corona

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनची संख्या वाढवावी, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठक महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यावेळी समोर आलेल्या आकडेवारीवरून त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. मात्र प्रशासनाने आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. सध्या केवळ ३२० नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. रुग्णसंख्येचा विचार केल्यास ही संख्या हजारोंच्या घरात असणे आवश्‍यक होते. 

कोरोनाचा संसर्ग शहरात झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. नऊ) आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिकेतर्फे सांगण्यात आलेल्या इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइनच्या आकडेवारीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने शहरात २२०० जणांना क्वारंटाईन करता येईल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र केवळ ५८८ जण इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइन असल्याचे आरोग्यमंत्र्यांना सांगण्यात आले.

येणाऱ्या काळात इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइनची संख्या वाढविण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली असली तरी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइन नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या फक्त ३२० जणच क्वारंटाईन आहेत. एका बाधित रुग्णांमागे किमान १५ जणांचा शोध घेऊन त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणे अपेक्षित आहे. मात्र सध्या महापालिका क्वारंटाईन करण्याऐवजी अॅन्टीजेन टेस्ट ज्या भागात रुग्ण जास्त आहेत, तिथे जाऊन घेत आहे. 

मे महिन्यामुळे वाढली संख्या 
बाधित रुग्णांच्या मागे १५ जण क्वारंटाईन करणे अपेक्षित आहे. मात्र महापालिकेची मे महिन्याची इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइनची संख्या प्रती रुग्णामागे फक्त सहा ते सात एवढीच होती. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाल्याचे बोलले जात आहे. 

सध्या क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 
संत तुकाराम वसतीगृह-८ 
कलाग्राम-१२ 
एमएसईडी वसतीगृह-२३ 
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय -३० 
विद्यापीठातील सीएसएम- ३६ 
विद्यापीठातील रमाई वसतिगृह-३० 
विद्यापीठातील अतिथिगृह- ५ 
विद्यापीठातील यशवंत वसतीगृह-३७ 
शासकीय बीएड. वसतीगृह- ८ 
गारखेडा डीएससी मुलांचे वसतीगृह-६३ 
गर्ल्स वसतीगृह- १३ 
डीएससी हॉल-१४, 
महर्षी शिंदे वसतीगृह-१ 
महसूल प्रबोधिनी- ५ 
जामा मशीद- ५ 
नवखंडा महाविद्यालय-१८ 

व्हीआयपी क्वारंटाइन 
हॉटेल मेनोर-५, 
हॉटेल सहारा-१ 
जिमखाना क्लब-५ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com