मृत्यूनंतरही फुटला नाही रक्ताच्या नात्याला पाझर...३६४ जणांचे मृतदेह घेण्यास नकार

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद ः कोरोनाने रक्ताची नाती देखील दूर केली. संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी आयुष्य सोबत घालविणाऱ्यांचे मृतदेह आम्हांला नको, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मोठा सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला व संकटाच्या काळात महापालिकेसाठी एका बचतगटाने व दोन सेवाभावी संस्थांनी हात पुढे केला. त्यानुसार आत्तापर्यंत ३६४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाची समाजमनात एवढी भिती निर्माण झाली आहे की, एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबाला वाळीत पडल्याचा अनुभव येत आहे. वर्षानुवर्षांचे संबंध असणाऱ्या शेजाऱ्यांनी दूर केल्याचे अनेक प्रकार घडले. मात्र रक्ताच्या नात्यानेही अंतर दिले. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संबधितांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्य पुढे येत नाहीत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

अशा परिस्थितीत पंचशील महिला बचत गटाने पुढाकार घेतला. त्यासोबत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि मोईन मस्तान ग्रुप या दोन सेवाभावी संस्थांनीही साथ दिली. पंचशील महिला बचत गटाने महापालिकेने आवश्‍यक तो खर्च करावा, आमही अंत्यसंस्कार करून असा प्रस्ताव ठेवला. तसेच सेवाभावी संस्थांनी मोफत अंत्यविधी करण्याची तयारी दाखवली. पंचशील महिला बचत गटाला महापालिका एका मृतदेहामागे दोन हजार रुपये देते. त्याशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजने अंतर्गत स्मशानजोगीला अडीच हजार रुपये दिले जातात. 

पाच पीपीई कीट, सॅनिटायझरचा पुरवठा 
बचत गटाला महापालिका प्रत्येक अंत्यविधीसाठी दोन हजार रुपये देते. त्यासोबत पाच पीपीई कीट, मास्क, सँनिटायझर, ग्लोज असे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. चार कीट मृत व्यक्तीला खांदा देणाऱ्यांसाठी तर एक कीट स्माशानजोगीसाठी असते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट 
पंचशील महिला बचत गटाच्या व मोईन मस्तान ग्रुपच्या माध्यमातून सर्वधर्मीय अंत्यसंस्कार केले जातात. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संस्था केवळ मुस्लीम व्यक्तींचेच अंत्यसंस्कार करते. अंत्यसंस्कारासाठी वापरलेले साहित्य एका पिवळ्या पिशवीत टाकून त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली जाते. महापालिकेने आत्तापर्यंत ३६४ अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावर सात लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com