आता १४ दिवसानंतर कंटेनमेंट झोनचे उठणार निर्बंध

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्ण वाढताच कंटेनमेंट झोन जाहीर करून संबंधित भाग पत्रे लावून बंद केला जातो. शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस या भागात निर्बंध कायम राहत होते. मात्र, आता ही मुदत चौदा दिवसांवर आली आहे. त्यानुसार बावीस वसाहतींची कंटेनमेंट झोनमधून मुक्तता झाली आहे. या वसाहतींमधील सुमारे २२ किलोमीटर परिसरातील तब्बल ५४ हजार नागरिकांची सुटका झाली आहे. 

शहरातील ज्या भागात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ते भाग लोखंडी पत्रे लावून सील केले जात आहेत. तसेच हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जात आहेत. या भागातील नागरिकांना घराबाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना परिसरात येण्यास मज्जाव केला जात आहे. गेल्या दोन तीन महिन्यांत शहरातील शेकडो वसाहतींमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. तिथे सातत्याने नवीन रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे त्या भागावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता बावीस वसाहतींची कंटेनमेंट झोनमधून मुक्तता झाली आहे. या बावीस वसाहतींमध्ये गेल्या चौदा दिवसांत नवीन रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे तेथील कंटेनमेंट झोन रद्द करून त्यांचा आकार मर्यादित करण्यात आला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

हे झोन पूर्णपणे रद्द 
वॉर्ड क्रमांक २०, भीमनगर, समतानगर, पुंडलिकनगर, बायजीपुरा, रहेमानिया कॉलनी, सातारा एसआरपीएफ कॅम्प, कैलासनगर. 
 
हे झोन रद्द करून त्यांचा आकार मर्यादित 
भवानीनगर, बेगमपुरा, न्यायनगर, गजाननगर, हनुमाननगर, पीरबाजार, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, मयूरनगर, शिवाजीनगर, एन-९, सिल्क मिल कॉलनी, शिवशंकर कॉलनी, परदेशी टॉवर, शहानूरवाडी. 
 
दोन नवीन झोनची भर 
आंबेडकरनगर, गौतमनगर, फुलेनगर तसेच अयोध्यानगर सिडको एन-७ या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आंबेडकरनगर-गौतमनगर-फुलेनगर आणि अयोध्यानगर, एन-७ असे दोन नवीन कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. या दोन झोनमध्ये १५८२९ नागरिक राहत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीन हजार चाचण्या, १२३ पॉझिटिव्ह 
महापालिकेने सोमवारी (ता. तीन) शहराच्या विविध भागांत ३१४७ अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या. यात ३००७ अँटीजेन चाचण्यांमधून १२३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सहा एन्ट्री पॉइंटवर एक हजार ४९३ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५२ जण पॉझिटिव्ह निघाले. दोन जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये १३८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार ५१४ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७१ जण पॉझिटिव्ह निघाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com