esakal | खरेेदीसाठी जाताय, मग हे वाचाच... एकाच दुकान एवढे कामगार पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

एका मँचिंगच्या दुकानातील बारा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाने हे दुकान सील केले. गेल्या दोन दिवसात हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

खरेेदीसाठी जाताय, मग हे वाचाच... एकाच दुकान एवढे कामगार पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडीवरील एका मॅचिंगच्या दुकानात तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित दुकान सील केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शहरात केली जात आहे. त्यानुसार एक ऑगस्टपासून शहरातील दुकाने, बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. या दुकानांमधून, बाजारपेठांमधून नागरिकांची गर्दी एवढी वाढली आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग संपला की काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने व्यापारी व विक्रेत्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्याच बरोबर ज्या दुकानात मालकाच्याशिवाय अन्य कर्मचारी देखील आहेत त्या दुकानातील करमचारयांना देखील करोना चाचणी करून घ्यावी लागत आहे. या चाचणीच्या दरम्यान गुलमंडी परिसरातील एका मँचिंगच्या दुकानातील बारा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाने हे दुकान सील केले. गेल्या दोन दिवसात हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी गेलेले ग्राहक अडचणीत आले आहेत. 
 
दिवसभरात २३६६ चाचण्या 
शहरात शनिवारी (ता. आठ) दिवसभरात महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या एन्ट्री पॉइंटवर ३२६६ जणांच्या अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात परळी वैजनाथ, परभणी, चंद्रपूर, केज (बीड), कळमनुरी या भागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोळा जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आता देशभर औरंगाबाद पॅटर्न 
शहरातील व्यापारी आणि विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने जुलै महिन्यात घेतला होता. आता हा औरंगाबाद पॅटर्न देशभर पोचला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत.