का होताहेत औरंगाबादमध्ये क्वारंटाईन सेंटर बंद 

माधव इतबारे
Saturday, 5 September 2020

किलेअर्क, एमजीएम आणि एमआयटी येथील कोविड केअर सेंटर आता डेडिकेटेड कोविड केअर सेंटर केले जातील. या ठिकाणी एक हजार खाटांची व्यवस्था आहे.

औरंगाबाद ः अँटिजेन चाचण्यांमुळे कोरोनाचा अहवाल तातडीने मिळत आहेत. त्यामुळे क्वारंटाइन सेंटर बंद केली जात आहेत. दरम्यान काही क्वारंटाइन सेंटरच्या ठिकाणी आता कोविड केअर सेंटर व तीन कोविड केअर सेंटचे रूपांतर डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये केले जाणार आहे, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. चार) सांगितले. 

कोरोनास्थितीबाबत श्री. पांडेय म्हणाले, की अँटिजेन चाचणीमुळे आता क्वारंटाइन करण्याची गरज नाही. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये, तर कोविड केअर सेंटर टप्प्याटप्प्याने डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर केले जाणार आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दोन हजार खाटांची क्षमता आहे. किलेअर्क, एमजीएम आणि एमआयटी येथील कोविड केअर सेंटर आता डेडिकेटेड कोविड केअर सेंटर केले जातील. या ठिकाणी एक हजार खाटांची व्यवस्था आहे. कोरोनाबाधित रुग्ण सुटी होऊन घरी गेल्यानंतर त्या व्यक्तींच्या प्रकृतीची माहिती ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धत पुढील आठवड्यापासून उभारली जात आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तसेच बजाज कंपनीने सीटी स्कॅन मशीन देण्याचे मान्य केले आहे, त्याचा रुग्णांना फायदा होईल, असे प्रशासक म्हणाले. मेल्ट्रॉन येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरसाठी २० केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. महापालिकेने २७ ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू केले होते. बहुतांश क्वारंटाईन सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोणीच नाही. त्यामुळे येथील कर्मचारी फक्त बसून होते. 

इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबादची स्थिती चांगली 
प्रशासकांनी राज्यातील काही शहरांमधील करोनाबाधितांची आकडेवारी दिली. नाशिक ग्रामीण भागात १०,४४३, नाशिक महापालिका क्षेत्रात २९,३०८, मालेगावमध्ये २,७२३, नगरमध्ये २२,४१५, जळगावमध्ये २९,४८८, नागपूरमध्ये ३२ हजार रुग्णसंख्या आहे. औरंगाबादमध्ये २३ हजार रुग्णसंख्या आहे. औरंगाबादमध्ये मराठवाड्यासह जळगाव, चाळीसगाव येथून अनेक जण उपचारासाठी येत आहेत, असे पांडेय यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad