
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेस पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.१६) सुरूवात झाली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेस पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.१६) सुरूवात झाली आहे. यावेळी खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी (ता.१४) औरंगाबाद शहरात सीरम इन्स्टिस्ट्यूट उत्पादित कोव्हिशील्ड कोरोना लशी दाखल झाली. एकूण १८ ठिकाणी कोरोना लसीकरण होणार आहे. यातील सात हे महापालिका हद्दीतील ठिकाणांचा समावेश आहे.
कुठे लस मिळणार ?
जिल्ह्यात १६ जानेवारीला सिल्लोड, गंगापूर, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय, कन्नड, पाचोड, खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. तसेच गणोर, पालोद, दौलताबाद, मनूर, निजलगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील बूथवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहराच्या हद्दीत सात ठिकाणी ती दिली जाणार आहे.
औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा
लसीकरण कोण करणार ?
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी ३७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. कोणत्या दिवशी लस दिली जाईल. याविषयी मेसेज येईल. मेसेज पोहोचला नाही, तर फोन करुन कोणत्या दिवशी लस दिली जाईल याची माहिती दिली जाणार आहे.
संपादन - गणेश पिटेकर