कोरोना योद्धेच होत आहेत घायाळ... औरंगाबादेत एवढ्या जणांना बाधा 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद ः कोविड रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या मेल्ट्रॉन कंपनीतील हे दोन डॉक्टर असून, या प्रकारानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आहे. इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान महापालिकेतील ३२ जणांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. 

शासनाने अडीच कोटी रुपये खर्च करून चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेवर कोविड हॉस्पिटल उभारले आहे. हे रुग्णालय महापालिकेतर्फे चालविले जात आहे. या ठिकाणी तीनशे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. यातील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर सध्या कोविड रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दोन्ही डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला, तरी त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. दरम्यान, बुधवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही डॉक्टरांच्या प्रकृतीची माहिती घेतली व त्यांना आराम घेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी पीपीई कीट घालूनच उपचार करतात; मात्र १२ ते १५ तास पीपीई कीट घालून राहणे शक्य नसल्यामुळे काही डॉक्टर, कर्मचारी मास्क लावूनच रुग्णालयात आरोग्यसेवेचे काम करतात. त्यामुळे ही बाधा झाली असण्याचा अंदाज आहे. 

बाधितांचा आकडा ३२ वर 
महापालिकेतील तीस जणांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यात या दोन डॉक्टरांची भर पडल्यामुळे करोनाबाधितांची संख्या ३२ झाली आहे. त्यापैकी दोन स्मशानजोगींचा मृत्यू झाला. करोनाबाधितांमध्ये साहाय्यक आयुक्त, वॉर्ड अधिकारी, कनिष्ठ अभियंता, इमारत निरीक्षक, सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. हे सगळे जण कोरोनावर मात करून कामावर रुजू झाले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

२६२१ अँटीजेन, ९७ जण पॉझिटिव्ह 
महापालिकेने बुधवारी (ता. १२) दिवसभरात २६२१ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर १८३० जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५५ जण पॉझिटिव्ह आले. १३ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये मिळून १२७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. मोबाईल पथकांच्या माध्यमातून ७९१ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४२ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com