Corona : चिंता करू नका...अवघ्या अर्ध्या तासात तुमच्याा हाती अहवाल 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद ः शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त स्‍वॅब घेऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अवघ्या अर्ध्या तासात अहवाल देणाऱ्या अँटिजेन टेस्टिंगच्या सुमारे २० हजार किट खरेदी केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात शासनाकडून सुमारे तीन हजार किट प्राप्त होणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. 

शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात सुमारे ५० हजार टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वीच्या चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीने केल्या जातात; मात्र आता अँटिजेन टेस्टिंग करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अवघ्या पाचशे रुपयांत हे किट उपलब्ध असून, अवघ्या अर्ध्या तासात निदानही होते. जुन्या पद्धतीनुसार अहवाल येण्यास चोवीस तास लागतात. शासनातर्फे तीन हजार अॅटिजेन टेस्टिंग किट महापालिकेला मिळणार असून, त्‍या बुधवारी (ता. सात) शहरात येतील तर महापालिकादेखील सुमारे २० हजार किट खरेदी करणार असल्याचे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 
पॉझिटिव्ह रुग्ण तातडीने कळणार 
ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येतात, तिथे या पद्धतीची टेस्टिंग उपयोगी पडते. जागीच अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण लवकर समोर येतो व त्याच्यापासून इतरांना बाधा होण्याचा धोका टळतो; मात्र निगेटिव्ह अहवाल आला तरी पुन्हा आरटीपीसीआर पद्धतीने टेस्टिंग करणे गरजेचे आहे, असे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 

मोबाईल टीमकडून २८७ स्वॅब संकलन 
‘स्वॅब कलेक्शन, आपल्या दारी’ मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागांत जाऊन मोबाईल टेस्टिंग टीम स्वॅब संकलित करीत आहे. मंगळवारी (ता. सात) दिवसभरात एकूण २८७ स्वॅबचे नमुने संकलित करण्यात आले. सुरेवाडी भागातून ६६, हडको एन-११ नवजीवन कॉलनी येथून ९५, हमालवाडा परिसरातून ४३, तर पदमपुरा येथून ७८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. बुधवारी (ता. आठ) ही पथके मथुरानगर, फिरदोस गार्डन पडेगाव, रमानगर, एन- ११ हडको येथील मयूरनगर भागात जाऊन नागरिकांचे स्वॅब घेणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com