संचारबंदीत गरजूंपर्यंत मोफत शिवभोजन 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 27 March 2020

शिवभोजनच्या माध्यमातून गरिबांना १० रुपयांत जेवण दिले जायचे; मात्र सध्या ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात शिवभोजन मोफत दिले जात आहे; तसेच फिरून गरजूंना अन्नाची पाकिटे मोफत वाटली जात आहेत. 

औरंगाबाद - कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी संपूर्ण जगभरात निकराचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात हाल मात्र हातावरचे पोट असणाऱ्यांचे होत आहेत. 

अशा हातावरचे पोट असणारे, दवाखान्यात दाखल रुग्णांचे नातेवाईक, बंदोबस्तावरील पोलिस यांना भोजनाचे पाकीट वाटपाचे काम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आणि शिवसैनिक कामाला लागले आहेत. 

शिवभोजनच्या माध्यमातून गरिबांना १० रुपयांत जेवण दिले जायचे; मात्र सध्या ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात शिवभोजन मोफत दिले जात आहे; तसेच फिरून गरजूंना अन्नाची पाकिटे मोफत वाटली जात आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दोन महिन्यांपूर्वी शहरात आमदार श्री. दानवे यांनी १० रुपयांत शिवभोजन सुरू केले. संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरातील शासकीय रुग्णालय, रेल्वेस्थानक आणि विमानतळसमोरील झोपडपट्टीत जाऊन श्री. दानवे यांनी गरजू, हातावर पोट असणाऱ्यांना अन्नाची एक हजार पाकिटे आणि दोन हजार पाण्याच्या बाटल्या वाटत सामाजिक बांधिलकी जपली. शहरातील गरजू नागरिक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, पोलिसमित्र, बाहेरील प्रवासी व विद्यार्थी यांना संचारबंदीच्या काळात अन्नाची पाकिटे वाटप सुरू आहे. शिवभोजनच्या स्टॉलवर गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांमध्ये दोघांत एक मीटरचे अंतर ठेवण्यात येत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अंबादास दानवे म्हणाले, कोरोनाचा धोका मोठा आहे, त्या विरोधातील लढा आपण एकत्रितपणे निश्चित जिंकू. संचारबंदीच्या काळात कुणीही उपाशी राहता कामा नये या भावनेतून दोन दिवसांपूर्वीच आपण गरजूंना शिवभोजनच्या माध्यमातून जेवण देत आहोत. आता संचारबंदी लागू झाल्यानंतर थेट गरजूपर्यंत जेवण पोचवण्याची व्यवस्था केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून गरजूंना मदत करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.  

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Free Shiv Bhojan Aurangabad News