Video : कोरोनाच्या भासापासून स्वतःला ठेवा दूर...  

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : हल्ली कोरोना अन् कोरोना हाच विषय सुरू आहे. त्यामुळे हाच विचार सारखा अनेकांच्या मनात घोळतोय. साधा सर्दी-खोकला झाला तरी अनेक जणांच्या मनात मला कोरोना होतोय का, अशी भीती वाटायला लागते. लागण झाल्याचा भासही होत आहे; पण अशा भासापासून स्वतःला दूर ठेवता येते. त्यासाठी सकारात्मक विचार आणि इतर काही बाबी केल्या तर घाबरायचे कारणच नाही.

ज्या व्यक्ती कोरोनाग्रस्त असतील, त्यांच्या संपर्कात आल्यासच कोरोना होऊ शकतो. साधा सर्दी, ताप, खोकला असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाची जी लक्षणे सांगण्यात आली आहेत. त्यातून आपण घाबरत आहोत. सध्या लॉकडाऊनमुळे आपल्याला दुसरे कुठलेच काम शिल्लक नाही. त्यामुळे डोक्यात फक्त एकच कोरोनाचे विचारचक्र सुरू आहे. कोरोना कुठून आला व तो कसा होतो याचेच विचार सारखे येत असल्याने आपले हॅल्युसिनेशन अर्थात भ्रम व्हायला लागतात.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

भ्रम होण्याचे कारण म्हणजे समाजाच्या आंतरक्रिया, योग्य माहिती न मिळणे होय. स्वतः अशाच भ्रमात राहणे ही भीती घातक आहे. परिस्थिती आपल्या हाताबाहेरची, विचार करण्यापलीकडची, कुठलीच गोष्ट दृश्य स्वरूपात नाही. त्यावर आपले नियंत्रणही नाही, इतरांवर माझे नियंत्रण नाही. माझ्या अनुभवाचा या परिस्थितीत काहीही उपयोग होणार नाही, होतही नाही. माझी शक्ती उपयोगाची नाही. या विचारांनी अस्वस्थता, चिंता, काळजी, भीती, ताण वाढतो आणि वैफल्य येते. 

मग अजिबात भीती बाळगण्याची गरज नाही 

कालपर्यंत वेगवेगळे स्रोत वापरून हवे ते केले. एकूणच मला पैसा, रिलेशन, बुद्धी आणि इतर संसाधने वापरून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत होते. तेच आता मिळवता येत नाहीये. यातून अज्ञात भीती (फियर ऑफ अननोन) वाढीस लागते. यावर पहिली प्रतिक्रिया काळजी, चिंता, भीती ही नैसर्गिक आहे, ती येणारच. ती अगदी अल्प कालावधीसाठी असते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊनपूर्वी आपली दैनंदिनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठरलेली होती. आता आपण केवळ घरातच बसतोय. स्वतःला एकाकी पडल्याचे वाटत आहे; पण तो आपल्याला मिळालेला एकांत आहे. खूप वर्षांनंतर ब्रेक मिळालाय. संधीचे सोने करा आणि सकारात्मक विचार मनात आणा. आपण कुठे होतो, यश कसे मिळविले, कोणत्या टप्प्यातून आपण आलो आहोत? याची गोळाबेरीज करा. कौटुंबिक नाते वाढवा. भावनिक व्यवस्थापन करा. कोरोनाच्या लक्षणांबाबत काळजी घेतली तर कोरोनाची भीती अजिबात बाळगण्याची गरज नाही. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे सांगतात...

  • मी जो विचार करतोय मला काही होईल का? की हे फक्त माझे मत बनविले आहे. मी माझ्यातील भावनिक फिल्टर लावून बघतोय का? वास्तवाशी त्याचा काही संबंध आहे का? हे वैज्ञानिक पातळीवर तपासावे. 
  • स्वतःवर नियंत्रण मिळवणे, स्वतःची काळजी घेणे, स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांना प्रेरित करणे. 
  • भूतकाळात मी असंख्य समस्यांवर विजय कसा मिळविला ते आठवा. 
  • मानसिक पातळीवर जो विचार करतोय तो शंभर टक्के बायोलॉजिकल होत नसतो. 
  • मानसिक ताण असे विचार करायला लावतात हे नक्की. त्यावर काळजी घेणे आवश्यक आहे. 
  • स्वतःशी वास्तववादी संवाद करा. मला काय वाटते यापेक्षा काय आहे, याचा विचार करा. 
  • दररोज -सूर्यनमस्कार, प्राणायाम दोन वेळा, तीन वेळा प्रत्येकी पाच मिनिटे दीर्घ श्वसन, शिथिलीकरण तंत्र करून बघा तुम्हाला उत्तर मिळेल. 
  • तुमच्या नियंत्रणात तुम्हीच आहात, तुम्ही तुमचीच काळजी घेणे, इतरांची काळजी करणे, घालून दिलेले नियम पाळणे हे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com