या तारखेपासून सुरु होणार डीएलएड प्रवेशाची प्रक्रिया... अर्ज प्रक्रियेत हे  झाले बदल 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डीएलएड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषध पुणे यांच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सोमवारपासून (ता.१७) या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात होईल. 

दरवर्षी जूनमध्ये सुरु होणारी डीएलएड प्रवेश प्रक्रिया दोन महिने उशीराने सुरु झाली. कोरोनामुळे सर्वच प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२० या वर्षातील प्रथम वर्ष डीएलएड प्रवेश प्रक्रियेसाठी अध्यापक विद्यालयांनी त्यांची संपूर्ण माहिती ऑनलाइन अद्यावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

यासाठी https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी माहिती द्यायची असून, विद्यालयाच्या एनसीटीई च्या मान्यता पत्राप्रमाणे असल्याची खात्री कराययची होती. तफावत असल्यास संबंधित पुराव्यासह support@deledadmission.in या ईमेलवर विद्यालयांनी कवळवायची होती. माहिती अद्यावत करण्यासाठी २८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. महाविद्यालयांची माहिती भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असून आता सोमवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. 


अर्ज करण्यासाठी सूचना 
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना स्वतःचा मेल आयडी असणे बंधनकारक आहे. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमांसाठी अर्ज करावयाचा असेल, तर प्रत्येक माध्यमास संवर्गनुसार स्वतंत्र आवेदनपत्र भरावे लागेल. प्रवेशास इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवारांस बारावी खुल्या संवर्गासाठी किमान ५० टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी support@deledadmission.in या इमेलवर पाठवाव्यात, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणचे संचालक दिनकर पाटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com