CoronaUpdate : औरंगाबादेत २०६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३२ हजार ७२४ रूग्ण झाले बरे

मनोज साखरे
Friday, 16 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) २०६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ९८२ झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) २०६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ९८२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १२ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण २ हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५४ व ग्रामीण भागात ८ रुग्ण आढळले. आज ३०९ जणांना सुटी झाली. यात शहरातील २१५ व ग्रामीण भागातील ९४ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३२ हजार ७२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)

गणेश नगर, रांजणगाव (१), धानोरा सिल्लोड (१), ब्राम्हण गल्ली, कन्नड (१), समर्थ नगर, कन्नड (२), हिवरखेडा रोड, कन्नड (१), करमाड (१), टाकळी (१), खुलताबाद (२), तळई (१), सम्यक गार्डन, पंढरपूर (१), गोलवाडी (१), एकतुनी पैठण (१), सिद्धेश्वर नगर, सिल्लोड (१), परसोडा, वैजापूर (२), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (१), रमाबाई आंबेडकर नगर, तिसगाव (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), वडगाव को. (१), महावितरण कार्यालयाजवळ, बजाज नगर (१), कलावती सो., सिडको महानगर (१), साक्षी रेसिडन्सी, बजाज नगर (१), ए.एस. क्लबजवळ, स्नेहवाटिका सो., (१), संस्कार विद्यालयाजवळ, बजाज नगर (१), बजाज नगर (२), ओम अपार्टमेंट, बजाज नगर (१), त्रिभूवन सो., बजाज नगर (१), साराआकृती, गंगापूर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), शिवकृपा सो., बजाज नगर (१), हरिओम नगर, बजाज नगर (१), जयविजय सो., बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), साई सो., बजाज नगर (१), छत्रपती नगर, बजाज नगर (१), विटावा, गंगापूर (२), देवगिरी सो., बजाज नगर (१), वाळूज (२), यश नगर, जोगेश्वरी (१), साई समृद्धी नगर, कमलापूर (१), ओमसाई नगर, रांजणगाव (२), अशोक नगर, विटावा (१), हनुमान मंदिराजवळ, बाळापूर (१), शिऊर (२), कन्नड (९), नागद, कन्नड (१), समता नगर, गंगापूर (२), डेपो रोड, वैजापूर (१), गोदावरी कॉलनी, वैजापूर (२), फुलेवाडी, वैजापूर (१), लाडगाव रोड, वैजापूर (१), दर्गाबेस, वैजापूर (१), वडगाव, गंगापूर (१), गंगापूर (२), वैजापूर (३), पैठण (१), सोयगाव (१)

निर्दयी काकाने दिले पुतण्याला चटके! व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

शहरातील बाधित रुग्ण

वेदांत नगर (२), घाटी परिसर (२), लेबर कॉलनी (१), सूतगिरणी चौक परिसर (२), जवाहर कॉलनी (१), राजेसंभाजी कॉलनी (१), नक्षत्रवाडी (२), एन सात सिडको (१), सातारा परिसर (१), गुरू रामदास नगर (१), तोतला हॉस्पीटल परिसर, आकाशवाणी (१), मयूर पार्क (१), पुंडलिक नगर (३), एन अकरा (१), एन पाच सिडको (१), देवानगरी (३), पद्मपुरा (२), कांचनवाडी (२), रोशन गेट परिसर (१), सारा वैभव, हर्सुल (१), उस्मानपुरा (१), दर्जी बाजार (२), पडेगाव, पोलिस कॉलनी (१), एन एक सिडको (१), सारा परिवर्तन, टीव्ही सेंटर (१), स्वप्ननगरी (२), शिवशंकर कॉलनी (१), भानुदास नगर (१), सारा राज नगर (१), पडेगाव (१), न्यू पहाडसिंगपुरा (२), बीड बायपास (३), एन तेरा भारत नगर (१), युनुस कॉलनी (१), न्यू हनुमान नगर (२), न्याय नगर (१), एसबीओए शाळेजवळ, हर्सुल (२), श्रीरंग सिटी, पैठण रोड (१), नारळीबाग (२), एन चार सिडको (४), छत्रपती नगर, हर्सुल (१), नागेश्वरवाडी (१), जानकी हॉटेल परिसर (१), मुकुंदवाडी (१), एकता कॉलनी (१), जुना बाजार (१), भाग्य नगर (१), मनिषा नगर (१), रामगोपाल नगर, पडेगाव (१), जाधववाडी, बांबू मार्केट (१), जय भवानी नगर (१), हनुमान नगर, सिडको (१), अन्य (१), टीव्ही सेंटर, हडको (१)

कोरोना मीटर
--------
बरे झालेले रुग्ण : ३२७२४
उपचार घेणारे रुग्ण : २२४६
एकुण मृत्यू : १०१२
---------
आतापर्यंतचे बाधित : ३५९८२
-------

 

संपादन -  गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 206 Cases Reported In Aurangabad