मराठा आरक्षणासाठी छावाचे ‘ढोल बजाओ’,सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन

देवदत्त कोठारे
Thursday, 1 October 2020

अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने खुलताबाद तहसीलसमोर बुधवारी (ता.३०) ढोल वाजवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) : राज्य सरकार युक्तिवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा संशय व्यक्त करत निष्काळजी राज्य शासन व केंद्र शासनाविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने खुलताबाद तहसीलसमोर बुधवारी (ता.३०) ढोल वाजवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी आरक्षणावरील स्थगिती उठवावी, तोपर्यंत पोलिस भरतीला स्थगिती द्यावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल गायकवाड यांना देण्यात आले.

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, आरक्षण स्थगितीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा...

कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर मराठा समाजास शिक्षण व नोकरीमध्ये १२ टक्के आरक्षण मिळाले. यासाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत शांततेत आंदोलन केली. कित्येक समाजबांधवांनी बलिदान दिले, तेव्हा कुठे राज्य शासनाने शिक्षण व नोकरीत १२ टक्के आरक्षण देण्यात आले होते; परंतु, मराठा समाजाला अत्यंत कष्टाने मिळालेले आरक्षण हे राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकले नाही.

आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असते, तर आज आरक्षणास स्थगिती मिळाली नसती. मराठा समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकार निष्काळजीपणा करीत आहे. त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने न्यायालयात कोविडमुळे पोलिस भरती करणार नाही, असे सांगितले आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलिस भरती जाहीर करीत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

मराठा नवउद्योजकांना बँकांसह महामंडळाचा खोडा !  

एसईबीसी प्रवर्गातील जागांबाबत राज्य शासन काय निर्णय घेणार आहे व यातून कसा मार्ग काढणार आहे हे जाहीर करावे. मराठा आरक्षण स्थगिती उठेपर्यंत पोलिस भरती स्थगित करावी, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, या मागणीचा सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शहर जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब भुमे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत खंडागळे, तालुकाध्यक्ष योगेश मालोदे, तालुका कार्याध्यक्ष अमोल बढे, पुंडलिक मालोदे, तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, गणेश कापसे, विशाल सूर्यवंशी, अभिजीत औटे, किशोर सदावर्ते, माउली शिरवत, महेश शिंदे, सोपान मालोदे, गुलाब दांडेकर, कारभारी जाधव, नारायण काळे, सुनील बारगळ, ज्ञानेश्वर पवार, योगेश शेळके, अमोल औटे, अभिषेक लाटे, गणेश लाटे, काकासाहेब दांडेकर उपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांच्या थकित वेतनासाठी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी !

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhol Bajao Andolan For Maratha Reservation Aurangabad News