केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरेंच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन, का वाचा?

Dhol Bajao Andolan
Dhol Bajao Andolan

औरंगाबाद : मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीचे आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठवा. आठ दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अशी मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गुरुवारी(ता.१७) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.


गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर सुरवातीला ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यात त्यानंतर कॅबिनेटमंत्री संदिपान भुमरे यांच्या घरासमोर आंदोलन "जागे व्हा, जागे व्हा राज्य सरकार जागे व्हा' अशा विविध घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारने आठ दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढावा, राज्यात होणाऱ्या पोलिस भरतीत मराठा समाजाला संधी द्यावी. अन्यथा ही भरतीला स्थगिती द्यावी.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात निधी द्यावा, सारथी संस्थेला पुरेसा निधी द्यावा, प्रत्येक जिल्ह्यांत मराठा वस्तीगृह उभारावे व बलिदान दिलेल्या कुटुंबियांना जाहीर केलेली मदत व कुटुंबांतील एक जणाला शासकीय नोकरी तात्काळ देण्यात यावी, अशी मागणीही या वेळी आंदोलनातून करण्यात आली, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक किरण काळे पाटील यांनी दिली.


मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. या स्थितीमुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात आरक्षण मिळणार नसल्याने मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने येत्या आठ दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा आज शांततेत ढोल बजाओ आंदोलन केले. त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल.
- किरण काळे पाटील

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com