#Youth_Inspiration : उद्योगाची कीर्ती लोकल ते ग्लोबल

प्रकाश बनकर
रविवार, 12 जानेवारी 2020

वाळूज एमआयडीसीत दिग्विजय इंडस्ट्रिजचे मालक श्रीराम शिंदे हे मूळ बुलडाणा जिल्ह्यातील. उद्योगासाठी ते औरंगाबादेत आले. शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेले शिंदे प्राध्यापक होते. संगमनेर येथील एका महाविद्यालयात त्यांनी तीन वर्षे काम केले; मात्र त्यांच्यातील उद्योजक त्यांना शांत बसू देत नव्हता. आपल्या भावाकडून थोडी-थोडी मदत उभी करत त्यांनी छोट्याशा शेडमध्ये आपला उद्योग सुरू केला.

औरंगाबाद -  मागास भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे; पण आता आता ही ओळख पुसली जात आहे. येथील उद्योग, कारखान्यांमुळे मराठवाड्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन उद्योजक तयार होत आहेत. औरंगाबादेत आपल्या वडिलांच्या उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि मार्केटिंगची जोड देत देशापुरता मर्यादित असलेला ट्रान्स्फॉर्मवरचे उत्पादन एक्‍स्पोर्टच्या माध्यमातून पंचवीसवर्षीय आशुतोष शिंदे यांनी थेट आफ्रिकेपर्यंत पोचविले. आपल्या कामाची झलक अल्पावधीतच दाखविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

वाळूज एमआयडीसीत दिग्विजय इंडस्ट्रिजचे मालक श्रीराम शिंदे हे मूळ बुलडाणा जिल्ह्यातील. उद्योगासाठी ते औरंगाबादेत आले. शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेले शिंदे प्राध्यापक होते. संगमनेर येथील एका महाविद्यालयात त्यांनी तीन वर्षे काम केले; मात्र त्यांच्यातील उद्योजक त्यांना शांत बसू देत नव्हता. आपल्या भावाकडून थोडी-थोडी मदत उभी करत त्यांनी छोट्याशा शेडमध्ये आपला उद्योग सुरू केला. आज या उद्योगाचा वटवृक्ष झाला आहे. श्रीराम शिंदे यांचा अनुभव, मार्गदर्शनात त्यांचा मुलगा आशुतोष यांनी मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या साथीने हा उद्योग आज जगभरापर्यंत पोचविला. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल 

उद्योग थेट विदेशापर्यंत कसा जाईल याचा अभ्यास केला

पुण्याच्या सिंहगड महाविद्यालयात मॅकनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर विविध उद्योगासोबत अशुतोष यांनी काम केले. त्यानंतर 2018 मध्ये वडील श्रीराम शिंदे यांच्या कंपनीत उत्पादन आणि मार्केटिंगची जबाबदारी स्वत: सांभाळली. कंपनीचे काम हाती घेतल्यानंतर केवळ देशभरापुताच मर्यादित असलेला आपला ट्रान्स्फॉर्मर निर्मितीचा उद्योग थेट विदेशापर्यंत कसा जाईल याचा अभ्यास केला. त्याविषयी मार्केटिंग कौशल्याचा प्रभावीपणे वापर करीत औरंगाबादच्या कंपनीत तयार झालेले ट्रान्स्फॉर्मर सहा महिन्यांपूर्वी आफ्रिकेत एक्‍स्पोर्ट केले. यात दोन हजार केव्ही आणि तीन हजार 150 केव्हीचा ट्रान्स्फॉर्मर विदेशात एक्‍स्पोर्ट केला आहे. आफ्रिकेतील लोकांना हे उत्पादन आवडल्यामुळे आणखी काही ऑर्डर येण्याची शक्‍यता असल्याचे आशुतोष यांनी सांगितले. 

हेही वाचा -  पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

लोकल टू ग्लोबल करण्याचे ध्येय 
वडिलांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या कंपनीला लोकल टू ग्लोबल करण्याचा स्वप्न उराशी बाळगून काम करीत असल्याचे आशुतोष यांनी सांगितले. वाळूजमध्ये सध्या चार प्लॅंट आहे. तेथे दीडशे लोकांना रोजगार मिळाला. भविष्यात आणखी प्लॅंट सुरू करणार असून, यातून आणखी रोजगार निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात सर्व फोकस हा परदेशावर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digvijay Industries Success story in startups