लग्न जुळेना म्हणून दिव्यांग मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, औरंगाबादेतील घटना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

लग्न जुळत नसल्यामुळे दिव्यांग तरुणाने घरातील खिडकीला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. शुक्रवारी (ता.११) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान तरुणाला बेशुध्दावस्थेत शासकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटीत) दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. समीर नबाजी खेमनार (२८, रा. संग्रामनगर) असे आत्महत्या करणाऱ्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

औरंगाबाद: लग्न जुळत नसल्यामुळे दिव्यांग तरुणाने घरातील खिडकीला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. शुक्रवारी (ता.११) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा- एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल

दरम्यान तरुणाला बेशुध्दावस्थेत शासकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटीत) दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. समीर नबाजी खेमनार (२८, रा. संग्रामनगर) असे आत्महत्या करणाऱ्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

दोन्ही भावांची लग्न झाली मात्र आपले लग्न दिव्यांगामुळे जुळत नाही, या नैराश्यातून समीर याने आज सकाळी खिडलीला वायरच्या सहाय्याने गळफास घेतला. समीर हा एका गॅस एजन्सीवर पावत्या फाडण्याचे काम करत होता. तीन फुट उंची असल्याने समीरचे लग्न जुळत नव्हते. दोन्ही भावांची मात्र लग्न झाली. यामुळे समीरला नैराश्य आले होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास समीर त्याच्या खोलीबाहेर अजून का आला नाही?

हेही वाचामध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध  

म्हणून वरच्या मजल्यावरुन खाली आलेल्या भावाने खिडकीतून डोकावले असता त्याला समीरने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर वडील व दोन्ही भावांनी खोलीचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. बेशुध्दावस्थेत समीरला घाटीत दाखल करण्यात आले.

मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार विक्रमसिंग चौहाण करत आहेत.

हे वाचलंत का- तिला म्हणाले, प्राध्यापकाची नोकरी लावतो, १७ लाखही उकळले, शेवटी तिनेच..

संपादनः सुषेन जाधव

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang Boy Commits Suicide Aurangabad News