कमिशनचे नव्हे, विकासाचे मिशन हवे : अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा

H.M.DESRDA.jpg
H.M.DESRDA.jpg

औरंगाबाद : शाश्‍वत विकासाच्या संकल्पना राबवण्यासाठी कमिशन आयोग नेमून काही साध्य होत नाही. त्यासाठी मिशन, चळवळची गरज असते. विकास, शिक्षण आणि तंत्रज्ञान या संकल्पनांची आता फेरव्याख्या करण्याची गरज आहे. या शब्दांची आता मला प्रकर्षाने भीती वाटू लागली आहे, असे मत अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
एमजीएम विद्यापीठाच्या एमजीएम-लोकसंवाद विचारपीठाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एमजीएम विद्यापीठाच्या विनोबा भावे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रा. देसरडा यांनी ‘महाराष्ट्राच्या समतामूलक शाश्वत विकासाची दिशा, दृष्टी, कृतीकार्यक्रम’ हा निबंध सादर केला. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रा. देसरडा म्हणाले, की जग सध्या तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे. मात्र, सोबतच अनेक समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. हवामान बदलाचा फटका, शेती आणि शेतकऱ्यांची दुर्दशा, उद्योग आणि शहरीकरणाचा प्रभाव, जनहिताचा उत्पादकीय रोजगार, नैसर्गिक संसाधने आणि रोजगार, आर्थिक व सामाजिक विषमता, अशा अनेक गोष्टींचा आपण प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात पुढील हजार वर्षांसाठी लागू असलेल्या शाश्‍वत विकासाचे विचार मांडले होते.

त्या विचारांवर काम होण्याची आता गरज आहे. सध्याच्या काळात विकास, शिक्षण आणि तंत्रज्ञान या संकल्पना खूप जोर धरत आहेत. मात्र, मला नेमक्या या शब्दांचीच भीती वाटू लागली आहे. कारण, विकास नेमके कशाला म्हणावे, हेच आपल्याला कळत नाही. जीडीपीतून विकास मोजला जातोय. मुळात जीडीपी हे विकासाचे मोजमाप होऊ शकत नाही, हे जगातील अर्थतज्ज्ञ म्हणतात. प्रा. बाळासाहेब सराटे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. कर्नल प्रदीपकुमार यांनी आभार मानले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com