जिल्ह्यात येणार आठ हजार टन युरीया खत -जिल्हाधिकारी उदय चौधरी

Eight Tons Urea Will Avaible In Aurangabgad District Marathi News
Eight Tons Urea Will Avaible In Aurangabgad District Marathi News

औरंगाबाद : जिल्ह्यात खतांचा पुरवठा लॉकडाऊन कालावधीतही सुरळीतपणे सुरू राहणार असून शेतकऱ्यांना सुलभतेने आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात आरसीएफ, कृभको, ईफको व जीएसएफसी या चार खत कंपन्यांचे ७ हजार ५०० ते ८ हजार टन युरिया खत औरंगाबाद जिल्ह्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी(ता.११) सांगितले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित जिल्ह्यातील लॉकडाऊन कालावधीत करण्यात येणाऱ्या खत पुरवठा व वितरणाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संबधिताना विविध सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह खत कंपन्याचे प्रतिनिधी, माथाडी कामगार तसेच ट्रक वाहतूक युनियनचे प्रतिनिधी, रासायनिक खत कंपन्यांचे वाहतूक व हाताळणी संस्था उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, जिल्ह्यात युरियासह इतर खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता राहणार आहे. या लॉकडाऊन कालावधीत खताच्या पुरवठ्यावर कुठल्याही प्रकारे बंधने येणार नसून सर्व शेतकऱ्यांना सुलभतेने गरजेनूसार युरिया तसेच इतर खते घेता येणार आहे. त्यादृष्टीने माथाडी कामगार, खत कंपनी प्रतिनिधी, ट्रक चालक यांनी खत वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू ठेवावे.

ट्रक चालक, माथाडी कामगार, खत कंपन्यांचे कर्मचारी, वाहतूक व हाताळणी संस्थेचे कर्मचारी याना पास देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या व पोलिस विभागाकडून खत वितरणामध्ये कुठलीही अडचण येणार नसल्याची खात्री दिली. लॉकडाऊन कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यासाठी नियोजनाप्रमाणे येणारे खत कंपन्यांनी आणावे व लॉकडाऊन आहे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची रेल्वे रेक दुसऱ्या जील्ह्याकडे वळवू नये अश्या सूचना खत कंपन्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com