फडणवीस म्हणतात मी परत येईल तर ते अजित पवारांच्या भरवशावर : रामदास आठवले

मधुकर कांबळे | Tuesday, 29 December 2020

शेतकऱ्यांना असणारी भीती चुकीची आहे. गावांचा सर्व्हे करावा, एका गावात पाच एकर जमीन असायला हवी याचा माहिती असावी.

औरंगाबाद :  फडणवीस म्हणतात मी परत येईल तर ते अजित पवारांच्या भरवशावर अस म्हणत आहे. ते आले होते, त्यांनी राहायला पाहिजे होते, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.29) ते बोलत होते. आठवले म्हणाले, की शरद पवार यांचा आदर आम्ही करतो, त्यांना नेतृत्व मिळाले तर चांगलेच, पण काँग्रेस त्यांना संधी देणार नाही, काँग्रेस पक्ष आता तसा मोठा पक्ष राहिला नाही. शेतकरी आंदोलन करत असताना राहुल गांधीने इटलीचा दौरा करण्याची गरज नव्हती.

 

 

Advertising
Advertising

संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश

 

 

शेतकऱ्यांना असणारी भीती चुकीची आहे. गावांचा सर्व्हे करावा, एका गावात पाच एकर जमीन असायला हवी याची माहिती असावी. भूमीहिनांना जमिनी मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे, फॉरेस्टच्या जमिनीवर झाड येत नसतील तर त्या ठिकाणी शेती होऊ शकते, त्याची जमीन राज्य सरकारने परत घ्यावी. त्याऐवजी दुसरी जमीन द्यावी. त्यासाठी लवकरच आंदोलन होईल, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. बहुमताने कायदा मान्य झाला आहे. शरद पवार साहेबांनी बैठक घ्यावी. मात्र त्यांनी शेतकरी कायद्यांना विरोधासाठी विरोध न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. त्यांनी विरोधकांसोबत चर्चा करावी आणि काही दुरुस्ती असले तर ती सुचवावी त्यावर नक्की विचार होईल. ते कृषिमंत्री होते. काँग्रेसच्या काळात कायदा प्रस्तावित होता.  कायदा रद्द करणे चुकीचे होईल. कायद्याचा स्वागत होईल असं वाटलं होतं.

 

गॅस दरवाढीविरुध्द अनोखं आंदोलन; नववधूच्या हातच्या भाकरी पंतप्रधान मोदींना पार्सल

 

शेतकरी आंदोलनाला आंदोलनकर्ते नेते जबाबदार आहे. तोडगा निघू शकतो. काही तडजोड करावी लागते. काही लोक हट्टाहास करत आहेत. सरकार चार पाऊल मागे आले आहे. एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील. लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. शेतकरी संघटनांची उद्या  बैठक होत आहे. त्यात जडजोडीचा मार्ग काढावा 2020 चे आंदोलन 2021 पर्यंत नेऊ नये. अदानी अंबानीला माल विकायचा नाही.  शेतकऱ्यांना जिथे जास्त भाव मिळेल तिथे त्यांनी तो विकावा असे कायदा सांगतो. अदानी अंबानीसाठी कायदा नाही, असे उत्तर शेती कायद्यांना  उद्योगधार्जीण असल्याच्या टीकेला आठवले यांनी दिले.

 

 

संपादन - गणेश पिटेकर