औरंगाबादमध्ये राज्य मराठी हाैशी नाट्य स्पर्धेची आजपासून अंतिम फेरी 

योगेश पायघन
Sunday, 2 February 2020

शहरातील रसिकांना महिनाभर दर्जेदार नाटकांची मेजवानी 

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या 59 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ता. तीन फेब्रुवारी ते चार मार्चदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यगृह व तापडिया नाट्यगृहात होणार आहे. उद्‌घाटन समारंभ विद्यापीठाच्या नाट्यगृहात सोमवारी (ता. तीन) साडेचार वाजता होईल. एकूण 46 नाटकांचे सादरीकरण या सत्रात होणार आहे.

तापडिया नाट्यगृहात रात्री साडेआठ वाजता नाटकाला सुरवात होईल. तीन फेब्रुवारी "किश्‍त बहार', चार फेब्रुवारीला "ब्लॅक आऊट', सहा फेब्रुवारीला "नातं', सात फेब्रुवारीला "हितचिंतक', नऊ फेब्रुवारीला "मातीमाय', 10 फेब्रुवारीला "चवीपुरतं', 12 फेब्रुवारीला "मॉर्फोसिस', 13 फेब्रुवारीला "गोदो वन्स अगेन', 15 फेब्रुवारीस सकाळी साडेदहा वाजता "आपुलाची वाद आपणासी', रात्री साडेआठ वाजता "हूज आफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वुल्फ', 17 फेब्रुवारीला "इस्टमन कलर', 18 फेब्रुवारीला "पूर्णविराम', 19 फेब्रुवारीला "चखोट घास', 21 फेब्रुवारीला "प्रार्थनासूक्त', 22 फेब्रुवारीला "ह्योच्या आईचा वग', 23 फेब्रुवारीला "शिमा', 24 फेब्रुवारीला "जननी जन्मभूमीश्‍च', 25 फेब्रुवारीला "विकट-एव-च', 27 फेब्रुवारीस "अवघड जागेचं दुखणं', दोन मार्चला "द लास्ट व्हाईसरॉय', तीन मार्चला "मोमोज' आदी नाटकांचे सादरीकरण होईल.

हेही वाचा : 
आपल्या तहसिलदार मॅडॅम हिरोईनसारख्याच दिसतात. 

याव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता तीन फेब्रुवारीला "म्याट्रिक', चार फेब्रुवारीला "मोक्षदाह', पाच फेब्रुवारीला "येळकोट', सहा फेब्रुवारीला "गर्भ', सात फेब्रुवारीला "पालशेतची विहीर', आठ फेब्रुवारीला "आषाढातील एक दिवस', नऊ फेब्रुवारीला "अंतक', 12 फेब्रुवारीला "एक होता बांबूकाका', 13 फेब्रुवारीला "एक्‍स्पायरी डेट', 14 फेब्रुवारीला "नीर', 16 फेब्रुवारीला "व्हाईट पेपर', 17 फेब्रुवारीला "अंतर्द्वंद्व', 18 फेब्रुवारीला "सारी रात्र', 19 फेब्रुवारीला "ब्रह्मसूत्र', 20 फेब्रुवारीला "हॅलो राधा मी रेहना', 24 फेब्रुवारीला "निळी टोपी', 25 फेब्रुवारीला "भावकी', 26 फेब्रुवारीला "या भुतांनो या', 27 फेब्रुवारीला "सृजनमयसभा', 28 फेब्रुवारीला "द गेम', 29 फेब्रुवारीला "हे राम', 1 मार्चला "घटोत्कच', दोन मार्चला "अंधार', तीन मार्चला "मरे एक त्याचा', चार मार्चला "मोठ्यांचा शेक्‍सफियर' या नाटकांचे सादरीकरण होईल. यासाठी केवळ 15 आणि दहा रुपयांचे तिकीट दर राहतील.

हेही वाचा - 

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final Round of Marathi Marathi Drama Competition from today in Aurangabad