रोहित पवारांकडुन पाचशे लिटर सॅनिटायझर भेट 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : शहरातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांवर चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार करतांना डॉक्टरांसह नर्सेससाठी प्रोटेक्शन असावे, यासाठी राष्टवादी कॉग्रेस पक्षाचे कर्जत - जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी सामान्य रुग्णालयास चारशे लिटर व पोलिस अधिक्षक कार्यालयासाठी शंभर लिटर असे पाचशे लिटर सॅनिटायझर पाठविले. मंगळवारी (ता.७) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्हा रूग्णालयास भेट हे साहित्य सुपुर्द केले. तसेच तेथील अडीअडचणीही समजुन घेतल्या. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सध्या सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार श्री. पवार यांच्या बारामती ऍग्रोतर्फे सॅनिटायझरची निर्मिती करण्यात येत आहे. मंगळवारी बारामती ऍग्रोतर्फे येथील शासकीय जिल्हा रूग्णालायास ४०० लिटर तर पोलिस अधिक्षक कार्यालयास १०० लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे.

त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र दुसरीकडे रुग्णालयांमध्ये स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या अचानकपणे घटली. त्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याअनुषंगाने दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य काही लोकप्रतिनिधींनी रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नीलेश राऊत, गणेश घुले, प्रतीक राऊत यांनी तातडीने घाटी रुग्णालयात जाऊन रक्तदान केले.

याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याबाबत मंत्री श्री. टोपे यांनी त्यांचे आभारही मानले. मात्र, दोन आणि चार जणांनी रक्तदान करून भागणार नाही, तर याबाबत जनजागृती करावी लागेल, यासाठी तरुणांच्या एका ग्रुपने बुधवारी (ता.२५) खासगी ब्लड बँकेला आपल्या घरी बोलावून रक्तदान केले. शिवाय, रक्त कमी पडू नये, यासाठी या संचारबंदीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले. या ग्रुपमध्ये राहुल येडे पाटील, अक्षय जायभाये, नितीन दहिहंडे, भास्कर तोंडे, अजिंक्य केतकर, विराज शेटे, नागेश माने यांचा समावेश आहे. 

आमदार चव्हाण यांनी हे सॅनिटायझर जिल्हा रूग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर व्ही. कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार चव्हाण यांनी जिल्हा रूग्णालयातील विविध वॉर्डाची पाहणी करून याठिकाणी कोण कोणत्या वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. सध्या तातडीने कोणत्या वस्तुंची गरज आहे, कर्मचाऱ्यांना काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत का?, एन-९५ मास्क व पीपीई कीट उपलब्ध आहेत का? आदीसंदर्भात संदर्भात डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली.

तसेच या वस्तु पुरवण्याची जबाबदारी ज्या हाफकिन इन्स्टिट्यूटवर आहे, त्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधून जिल्हा रूग्णालयाला लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची त्वरीत पूर्तता करण्याची मागणी केली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, औषध निर्माण अधिकारी गुणवंत भारूळे, शितल जेवे, कृष्णा शेलार, औरंगाबाद राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोंळुके यांच्यासोबत आमदार श्री. पवार यांनी सद्य:स्थितीबद्दल मोबाइलवरुन चर्चा करीत परिस्थिती जाणुन घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com