esakal | Corona Breaking: औरंगाबादेत अवघ्या साडेसात तासात चौघांचा मृत्यू, एकूण ८२ बळी, मृत्यूदर ५ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

औरंगाबादेत एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मृत्युदरातही वाढ होत आहे. मृत्यूदर ४.९९ एवढा झाला. हा दर जास्त लागण झालेल्या शहरांच्या बरोबरीने आहे. शहरातील शहागंज आणि पिसादेवी भागात राहणाऱ्या दोघांचा कोरोना आणि इतर आजाराने आज (ता.२) व खिवंसरा पार्क, गारखेडा भागातील एकाचा सोमवारी (ता.१) रात्री साडेअकराला बळी गेला. हे मृत्यू साडेचार तासात झाले असून आता एकूण मृत्यूसंख्या ८२ वर पोचली आहे.

Corona Breaking: औरंगाबादेत अवघ्या साडेसात तासात चौघांचा मृत्यू, एकूण ८२ बळी, मृत्यूदर ५ टक्के

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: शहरात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मृत्युदरातही वाढ होत आहे. मृत्यूदर ४.९९ एवढा झाला. हा दर जास्त लागण झालेल्या शहरांच्या बरोबरीने आहे. शहरातील शहागंज आणि पिसादेवी भागात राहणाऱ्या दोघांचा कोरोना आणि इतर आजाराने आज (ता.२) व खिवंसरा पार्क, गारखेडा भागातील एकाचा सोमवारी (ता.१) रात्री साडेअकराला बळी गेला. हे मृत्यू साडेचार तासात झाले असून आता एकूण मृत्यूसंख्या ८२ वर पोचली आहे.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

८० वा मृत्यू
शहागंज भागात राहणाऱ्या ५४ वर्षीय पुरुषाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता. २३ मे पासून त्यांना ताप, खोकला व दम लागत होता. २७ मे रोजी प्रकृती बिघडत असल्याने त्यांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. लक्षणावरून त्यांची लगेचच कोरोना चाचणीसाठी लाळेचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल  पॉझिटिव्ह आली. शरीरातील ऑक्सिजनचे कमी प्रमाण आणि दोन्ही फुफुसात संसर्ग आणि रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त वाढले. त्यांना इन्सुलिन सुरु करण्यात आले. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान दोन जूनला पहाटे एकच्या सुमारास मृत्यू झाला.

८१ वा मृत्यू
गौतमनगर, पिसादेवीरोड येथील ६९ वर्षीय महिलेला २६ मे पासून दम लागत होता. त्यांना १२ वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता. त्यांना ३१ मे रोजी खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. रुग्ण स्टेबल झाल्यानंतर डायलिसिस देण्यात येणार होते परंतु रक्तदाब कमी होत असल्याने देता आले नाही. या रुग्णाचा २ जूनला पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला.

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

८२ वा मृत्यू
कैलासनगर येथील ५६ वर्षीय पुरुषाला २८ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. लक्षणावरून त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. २९ मे रोजी त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २ जूनला सकाळी सात वाजता मृत्यू झाला. युरेमिक ऐंसेफॅलोपथी विथ बायलॅटरल न्यूमोनिया ड्युटू कोविड नेफ्रोपॅथी सिव्हयीर सायटोकाईन स्ट्राम कोविड असोसिएटेड कोएगुलोपॅथी इन नोन केस ऑफ इसचेमिक हार्ट डिसीज हे त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.

साडेसात तासात चार मृत्यू
घाटीत गौतमनगर, पिसादेवी रोड, शहागंज आणि कैलासनगर येथील रुग्णाचा आज (ता. २) आणि  एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा १ जून रोजी रात्री  ११.३० वाजता  उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे साडेसात तासात चौघांचे मृत्यू झाले. आतापर्यंत घाटीत ६६,  तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ८२ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा- CoronaUpdate: औरंगाबादेत आज ५५ रूग्णांची भर, एक मृत्यू @१६४२