PHOTOS : औरंगाबादमध्ये भीषण अपघात, चार ठार, पाच जखमी, भाविकांवर काळाचा घाला!

संतोष शेळके
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

या भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार झाले. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले.

करमाड (जि. औरंगाबाद) - इगतपुरीहून देवदर्शन करून सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) आणि जालन्याकडे परतणाऱ्या भाविकांची क्रुझर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. ही घटना आज (ता. 31 जानेवारी)  पहाटे तीनच्या सुमारास गाढेजळगाव शिवारात घडली. 

प्राप्त माहितीनुसार,  क्रुझरमधील प्रवासी इगतपुरीहून देवदर्शन करून सिंदखेडराजाकडे (जि. बुलडाणा) परतत होते.  दरम्यान, करमाडजवळ  गाडेजळगाव शिवारात शुक्रवारी पहाटे भरधाव क्रुझर (MH28 AN 3620)रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरवर (MH40BJ8111)मागच्या बाजूने धडकली.  या भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार झाले. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले.

 
मृतांची नावे 

  • काशिनाथ देवराव मेहत्रे (६२)
  • रवी बबन जाधव (३२) दोघेही रा.नशिराबाद ता.शिंदखेडराजा
  • सांगीता गणेश बुंदे (४५) रा.तांदूळवाडी ता.शिंदखेडराजा
  •  ऋषीधर देवराव तिडके (५५) रा.गोंदेगाव ता.जी.जालना.

Image may contain: night and outdoor

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Killed in Accident At Karmad