त्यांनी तिला वाहनात कोंबले, शहरभर फिरवत केला सामूहिक बलात्कार

 Gang Rape In Aurangabad
Gang Rape In Aurangabad

औरंगाबाद - दोन अल्पवयीन बहिणींना सूपमधून गुंगीचे औषध दिल्यानंतर वाहनात फिरवून मोठ्या बहिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात पोक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना अटक केली. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत (ता.20) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कटकटगेट परिसरातील 17 आणि 14 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींना एका महिलेने फोन करून मंगळवारी (ता.14) मैत्रिणीच्या साखरपुड्यासाठी शहागंज गांधीपुतळा भागात बोलावून घेतले होते. तिथे त्या गेल्या असता, त्या महिलेने तिच्या सहकाऱ्याच्या मदतीने जबरदस्ती रिक्षात बसवले आणि निराला बाजार येथील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे त्यांना नशेच्या गोळ्या टाकलेले सूप प्यायला दिले. सूप पिल्यानंतर त्यांना गुंगी आली. त्यांना गुंगी आल्यावर त्या दोघांनी रिक्षात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेले. तिथून अन्य एका वाहनातून शरणापूर फाटा, कागजीपुरा, खुलताबाद, घाटी दवाखाना असे फिरवले. त्या वाहनात अमन, सलमान आणि मझहर आणि एक महिला होती. संशयितांकडून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर या मुलींना घराकडे सोडून देण्यात आले.

हे आहेत संशयित

याप्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक पोलिस ठाण्यात छेडछाड आणि पोक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (ता.16) रात्री चौघांना, तर शुक्रवारी (ता.17) तिघांना असे या प्रकरणातील सात जणांना अटक करण्यात आली. या संशयितांमध्ये शरफराज शमशोद्दीन शाह (वय 20, रा. इंदिरानगर, बायजीपुरा), आयाज फयाज खान (26, रा. बायजीपुरा), अदनान सलमीन चाऊस (29, रा. इंदिरानगर), एक 24 वर्षीय महिला (रा. सईदा कॉलनी), सलमान बाबू खान (27, रा. बेगमपुरा) मझहर खान जफर खान (27, रा. बेगमपुरा) आणि विक्रम ऊर्फ अमान कडुबा शिंदे (19, रा. राधास्वामी कॉलनी) यांचा समावेश आहे.

तीन दिवसांची पोलिस कोठाडी

चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित तिघांना शनिवारी (ता.18) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद, उपायुक्‍त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्‍त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेख सय्यद, पोलिस उपनिरीक्षक श्री. पाथरकर, पोलिस हवालदार अप्पासाहेब देशमुख, नाईक बाशीद पटेल, पोलिस कर्मचारी देशराज मोरे, बालाजी तोटेवाड, माजीद पटेल, बारगळ यांनी ही कारवाई केली. महिला पोलिस उपनिरीक्षक वंदना मुळे पुढील तपास करीत आहेत. 
 
हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com