गौरी लंकेश हत्येतील ऋषीकेशचे एमएपर्यंत शिक्षण, कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना अटक झाली होती. यानंतर औरंगाबादेत काही काळ वास्तव्य करणाऱ्या ऋषिकेश देवडीकर याचाही ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सहभाग असल्याची बाब समोर आली. त्यालाही गुरुवारी अटक झाल्याने विचारवंतांच्या हत्यांमध्ये मराठवाड्यातील तीन जणांचा मुख्य सहभाग आता समोर आला आहे. 

औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोप असलेल्या संशयित ऋषिकेश देवडीकरचे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचा कट्टर हिंदुत्ववादी संघटनांसोबत संबंध होता.

तो या संघटनांचा प्रचारक होता; त्याला तेव्हा "सनातन'कडून प्रचारक म्हणून सहा हजार रुपये मानधन दिले जात होते, अशी माहितीही समोर आली आहे. सोलापूर, औरंगाबादचा नव्हे तो मुळ कळंब, (जि. उस्मानाबाद) येथील आहे. 

Image may contain: 1 person, hat and close-up
ऋषिकेश देवडीकर

औरंगाबादेत 2011 मध्ये ऋषिकेश देवडीकर राहत असल्याचे त्याच्या मतदान ओळखपत्रावरुन दिसून येते. काही काळाच्या वास्तव्यानंतर मार्च 2016 ला हा कुटुंबीयांसोबत सिडकोत किरायने राहण्यासाठी आला होता. चार मार्च 2016 रोजी त्याने सिडको एन-नऊ येथील घरमालक यशवंत शुक्‍ला यांच्याशी नोटरीसह भाडेकरारनामा केला होता.

Image may contain: 1 person, close-up, possible text that says 'गौरी लंकेश हत्या प्रकरण'

सोबतच वैयक्तिक माहितीही जोडली होती. सुरवातीला वर्षभरासाठीच आपण येथे राहणार आहोत असे त्याने घरमालकाला सांगितले होते. 27 मार्च 2016 ते 27 फेब्रुवारी 2017 या अकरा महिन्यांच्या कालावधीचा त्याने भाडेकरारनामा केला.

अनामत ठेव म्हणून घरमालकाकडे सहा हजार रुपयेही त्याने दिले होते. पाच हजार रुपये भाड्याने तीन खोल्यांत तो आई, वडील, पत्नीसह राहत होता. त्यानंतर वर्ष 2019 मध्ये त्याने औरंगाबाद सोडले व गेल्या एप्रिलमध्ये त्याचे वडीलही मुंबईत मुलाकडे राहण्यासाठी गेले होते. 

फेसबुकवरही कट्टर 
हिंदुत्ववादी विचार 

ऋषिकेशचे फेसबुकवर अकाऊंटही असून, त्यात हिंदुत्ववादी विचारांशी संबंधित पोस्ट आहेत. या पोस्ट त्याला टॅग केलेल्या आढळून आल्या; तसेच त्याने विविध कट्टर हिंदुत्ववादी पेजेसही लाईक केलेले दिसून आले आहे. 

औरंगाबादेत प्रचारकाचे काम 

औरंगाबादेतही ऋषिकेश हिंदुत्ववादी संघटनांसोबत काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू जनजागरण समिती आणि सनातन संस्थेशी संबंधित पत्रकांना प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी देण्यासाठीचे काम तो करीत होता. तसेच खादी शर्ट, पायजमा व कपाळावर "सनातन स्पेशल' टिळा ऋषिकेश देवडीकर लावायचा, अशी माहिती स्थानिकांच्या चर्चेतून समोर आली आहे. 

प्रसाराच्या कार्यासाठी 
घेत होता बैठका 

सनातनचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्यासाठी ऋषिकेशला सहा हजार रुपये महिना मिळायचा. सनातन प्रभात व हिंदू जनजागृतीचे कार्य पोचविण्यासाठी तो औरंगाबादेतील वाड्या, वस्त्यांसह कॉलनीत जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही समोर आली आहे. दरवर्षी कडा कार्यालयाच्या मैदानावर व राजीव गांधी मैदानावर आयोजित हिंदू धर्म जागृतीसभेत त्याचा सक्रिय सहभाग असायचा. 

देवडीकर मूळ कळंबचे 
गौरी लंकेश हत्येतील संशयित ऋषिकेश देवडीकर याच्या वडिलांनी 1999 ला कळंब (जि. उस्मानाबाद) सोडले. तिथे त्यांचा टाईपरायटिंगचा व्यवसाय होता. ऋषिकेशचे वडील भास्करराव देवडीकर 1999 पूर्वी कळंबमध्ये राहत होते. त्याला एक छोटा भाऊ आहे. त्याचे वडील टायपिंग क्‍लासेस चालवीत होते.

काही काळानंतर टाईपरायटिंग व्यवसाय बंद केल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी कळंब सोडले. ऋषिकेश खासगी शिकवण्या घेत असल्याची माहिती समोर आली असून, तो "सनातन'चे कामही करीत असल्याचेही पुढे आले आहे. 

हेही वाचा - धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

मराठवाड्यातील तिघे 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना अटक झाली होती. यानंतर औरंगाबादेत काही काळ वास्तव्य करणाऱ्या ऋषिकेश देवडीकर याचाही ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सहभाग असल्याची बाब समोर आली. त्यालाही गुरुवारी अटक झाल्याने विचारवंतांच्या हत्यांमध्ये मराठवाड्यातील तीन जणांचा मुख्य सहभाग आता समोर आला आहे. 

अंदुरे, कळसकरशी 
संबंधांचा तपास सुरू 

गौरी लंकेश हत्येतील ऋषिकेशच्या आधी पकडलेल्या काही संशयितांचा शरद कळसकरशी संबंध आल्याचे समोर आले होते. ऋषिकेश औरंगाबादेत राहत असलेल्या कालावधीत त्याचे दाभोलकर हत्येतील संशयित शरद व सचिन अंदुरे यांच्यासोबत संबंध आले होते का, याची चाचपणी एटीएस पथक करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा - साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

  Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी

संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार
Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Lankesh's Murder case Rishikesh's MA Education, Relations with fanatic Hindu organizations