कोरोनामुळे बहरू लागल्या परसबागा 

Bhajipala
Bhajipala

औरंगाबाद :  गावातलं छोटेसे टुमदार घर. पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत रोज लागणाऱ्‍या भाजीपाल्याची लागवड. म्हणून गावात आज भाजी कोणती करायची याचा महिलांना कधी प्रश्‍न पडत नाही. कारण घरामागच्या परसबागेत जायचे आणि पाहिजे ती ताजी भाजी झाडाची तोडून आणायची. ज्यांना असा ताजा भाजीपाला खाण्याची आवड आहे, थोडेसे बागकाम करण्याचा छंद आहे त्यांनी शहरात आले तरी मिळेल तेवढ्या जागेत आपल्या कुटुंबापुरती भाजीपाल्याची, फळभाज्यांची रोपे लावली. त्यांना लॉकडाउनमध्ये भाजी काय करावी, असा कधी प्रश्‍न पडला नाही. 

गेले तीन साडेतीन महिने कडक लॉकडाउन होते. त्यात भीत भीत फेरीवाले आले तर कोरोनाची भीती. तोंडाला मास्क लावून, खिशात सॅनिटायझरची बाटली ठेवून फेरीवाल्याकडे गेल्यानंतर तिथे होणारी गर्दी धडकी भरविणारी त्यामुळे अनेकांनी भाजीपाला खाणेच बंद केले. जरी भाजीपाला घेतला तरी तो स्वच्छ धुऊन तासभर बाहेरच ठेवायचा आणि मगच त्या भाजीपाल्याला स्वयंपाकघरात जागा मिळायची.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

थेट शेतकऱ्यांकडून घेतलेला भाजीपाला कसाबसा तीन चार दिवस चांगला राहतो; मात्र शहरी भागात किंवा शहरात पिकवलेला भाजीपाला एका दिवसातच खराब होण्याचे नित्याचे झाले. यावेळी गावाकडील परसबागेची राहून राहून आठवण येऊ लागली. लॉकडाउनच्या काळात लोकांना परसबागेत भाजीपाला असला पाहिजे याचे महत्त्व पटले आहे. यामुळे घराभोवताली असलेली मोकळी जागा, ती नसेल तर टेरेसवर कुंड्यांमध्ये भाजीपाला पिकवण्याकडे ओढा वाढला आहे. ज्यांना परसबागेतील भाजीपाला लावण्याची आधीपासून आवड आहे त्यांनी आम्हाला लॉकडाउनमध्ये भाजीपाल्याची कोणतीच अडचण आली नसल्याचे सांगितले. 

कचऱ्यापासून खत

विवेक येवले (नागरिक) : सिडको एन-१ येथील माझ्या घरासमोर व कंपाउंडमध्ये शेवगा, कांदा, कढीपत्ता, वांगी, मिरची, टोमॅटो, हादगा, पपई, पेरू, भेंडी, समुद्रशोक, घोळ, भोपळा, काकडी, कारली, चवळी, चुका, पालक, शेपू, फुलकोबी, सीडलेस लिंबू, अळू या भाज्या तसेच सोनकेळी, फणस, पेरू, सीताफळ, मोसंबी फळे, फुले, औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. लॉकडाउनच्या काळात आम्हाला भाजीपाल्याची कधीच काळजी वाटली नाही. याला खतदेखील घरात निघणाऱ्या कचऱ्यापासून तयार करतो. आता आमचे पाहून काहीजण प्रेरणा घेऊन घरच्या घरी भाजीपाला लागवड सुरू करीत आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यंदा मागणी वाढली 

डॉ. दत्ता सावंत (लॉर्डस् वनौषधी नर्सरी) :  आमच्या नर्सरीत औषधी वनस्पतीसोबतच भाजीपाल्याचीही रोपे तयार करतो. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी वाढली आहे. मिरची, वांगी, कारले, दोडके, भोपळा, मटकी, गवार, भेंडी, टोमॅटो, फुलकोबी, लसूण, कांदा, पातीसाठीचा कांदा, चुका, मेथी, शेपू, पालक अशा विविध पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या रोपांना यावर्षी मागणी वाढली आहे. तसेच टेरेसवर याची लागवड करण्यासाठी खते, कुंड्या लोकांनी नेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कदाचित यावर्षी घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्याकडे ओढा वाढला असावा. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com