पालकमंत्र्यांनी केली घाटीतील विकासकामांची पाहणी

gmch aurangabad
gmch aurangabad

औरंगाबाद- उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी परिसरात सुरू असलेल्या शवविच्छेदनगृह इमारत, एमआरआय यंत्रासाठीचे बांधकाम, सुपर स्पेशालिटी विंग इमारतीच्या माहितीसह रुग्णालयातील समस्यांचे सादरीकरण केले.

पालकमंत्री देसाई यांनी सुपरस्पेशालिटी विंगसाठी लागणारी यंत्रसामग्री, इतर सुविधा किती दिवसांमध्ये पूर्ण होईल, याबद्दल माहिती घेतली. अधिष्ठाता कार्यालयात पालकमंत्र्यांनी महाविद्यालय परिषदेत सर्व विभागांच्या प्रमुखांकडून घाटी रुग्णालयाच्या कामकाजातील अडचणी समजून घेत आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाचे स्वतंत्र प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, राज्य कर्करोग संस्थेची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, बांधकाम विभागाचे श्री. भगत, कदीर अहमद, के. एम. आय. सय्यद आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री येणार या पार्श्‍वभूमीवर घाटी प्रशासनाने परिसराची साफसफाई करून घेतली होती. त्यावर रोज मंत्री आले तर घाटी अशी स्वच्छ राहील, असे नातेवाईक कुजबुजत होते. 

आज घाटीत शिवभोजनाचे उद्‌घाटन 
घाटी रुग्णालयात राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेला सुरवात होत असून, दहा रुपयांत सकाळी बारा ते दोनदरम्यान भोजनाची व्यवस्था झुणका-भाकर केंद्र येथे करण्यात आली. पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 26) उद्‌घाटन होणार असल्याचे या केंद्राचे संचालक संजय भैरव व राजू भैरव यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com