Video : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदूक

मनोज साखरे
मंगळवार, 7 जानेवारी 2020

औरंगाबाद : मुंबईवर 26/11 ला झालेला दहतशवादी हल्ला आणि झालेला रक्तपात अजूनही थरकाप उडवतो. या हल्ल्यात समुद्रमार्गे आलेल्या अजमल कसाब व इतर दहशतवाद्यांनी ताज हॉटेलसह इतर ठिकाणांना लक्ष्य केले होते.

या हल्ल्यात दहशतवाद्यांनी एके-47 ही बंदूक वापरली. आपल्याकडेही ही गन होती. पण दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याकडे फोर्सवनची स्थापना झाली आणि एके 47 पेक्षाही अपडेटेड एमपी-5 सबमशीनगन वापरायला सुरुवात केली. या दोन्ही बंदुकींबाबत चला जाणून घेऊया. 

एमपी-5 सबमशीन गन

  1. एमपी -5 सबमशीन गन ही जर्मन बनावटीची आहे.
  2. 1966 ला या गनची निर्मिती झाली. या गनचे वजन 3 किलो 250 ग्रॅम आहे. मॅगझीनची क्षमता 30 राऊंड बसेल एवढी असते. मॅगझीनचे राऊंड 9 एमएमचे असतात. रिकाम्या मॅगझीनचे वजन 170 ग्रॅम असते. 
  3. शंभर मिटरवरील ही गन अचुक वेध घेत लक्ष्याला मारते व चारशे मिटरवरील लक्ष्याला जखमी करते. 
  4. 26/11 हल्ल्यावेळी ही गन आपल्याकडे नव्हती. त्यानंतर मात्र ही गन आपल्याकडे आली. 

No photo description available.

कुणाकडे असते ही गण.. 

सबमशीनगन ही फोर्सवनकडे असते. फोर्सवन तसेच महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यातील क्‍युआरटी पथकाकडे असते. सद्यस्थितीत सीआयएसएफ, बीएसएफ यांचेही क्‍युआरटी पथके आहेत. तेथेही ही सबमशीनगन दिली जाते. क्‍युआरटीच्या सहा सदस्यांच्या गटात पाचजणांकडे ही गन असते, तर सहाव्याकडे एके-47 असते.

एके 47 रायफल

एके 47 रायफल ही रायफल रशियन बनावटीची आहे. या रायफलचा दहशतवाद्यांनी मुंबई हल्ल्यावेळी वापर केला होता. 1947 साली या रायफलची निर्मिती झाली म्हणून हिला एकेसोबत 47 लावले जाते. प्रत्यक्षात या रायफलचा वापर 1949 ला करण्यात आला हे विशेष. मॅगझीनशिवाय या रायफलचे वजन 4 किलो 600 ग्रॅम आहे. मॅगझीनमध्ये 30 राऊंड बसतात. 7.62 एमएम अशी राऊंडची साइज असते. मॅगझीनसोबत या रायफलचे वजन 5 किलो 127 ग्रॅमच्या आसपास असते. 300 मिटरपर्यंत ही रायफल अचुक वेध घेते. 

काय आहे फोर्स वन..

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांकडे दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी स्वतंत्र पथक नव्हते. त्यावेळी एनएसजी कमांडोना पाचारण करावे लागले होते. तोपर्यंत बराच उशिरही झाला होता. ही गरज लक्षात घेऊन तेव्हा फोर्सवनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर राज्यातील अकरा जिल्ह्यात क्‍युआरटीही स्थापन झाली. फोर्सवनला इस्त्राईलच्या कमांडोकडून प्रशिक्षण देण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gun Used By Terrorists In 26/11 Attack On Mumbai Maharashtra News