मराठीत जागतिक दर्जाच्या साहित्याचा अभाव : डॉ. संजय सोनवणी

 Gunijan Sahitya Sammelan
Gunijan Sahitya Sammelan

औरंगाबाद - "मराठी साहित्य उथळ आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्रसह देशात पोचत नाही. साहित्यिकांचे जीवनविश्‍व हे मर्यादित राहत असल्याने त्यांचे अनुभव, कल्पनाशक्‍तीचा अभाव हा त्यांच्या मर्यादा आधोरेखित करतो. यामुळे जे साहित्य जागतिक दर्जाचे बनायला पाहिजे ते तसे होत नाही,'' अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय सोनवणी यांनी शनिवारी (ता. 25) व्यक्‍त केली. 

धोंडीराम माने विकास प्रबोधिनीतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात 13 वे गुणीजन साहित्य संमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. सोनवणी होते. आमदार लहुजी कानडे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, आर. के. गायकवाड, फ. मुं शिंदे, साहित्यिक रेखा बैजल, स्वागताध्यक्ष डॉ. राखी सलगर, सुनीता माने, आयोजक सुभाष माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात डॉ. यशवंत देशपांडे यांना मान्यवरांच्या हस्ते 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. सोनवणी म्हणाले, "आजही मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणारी पुस्तके हे इंग्रजीतील अनुवादित असतात. ही वस्तुस्थिती आहे. साहित्यिक व्यापक अनुभवाला समोरे जाऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांवर साहित्यिक कवींनी कविता लिहिल्या. त्यातील अनेक गाजल्या, काहींना टाळ्या मिळाल्या, काही तोंडपाठही झाल्या; परंतु दुर्दैव आहे, की याच कवींना शेतकऱ्यांच्या समस्यांच्या मुळाला हात घालता आले नाही.'' 

मराठी भाषेचा अभिजात दर्जा केवळ ठरावापुरताच 
महाराष्ट्रात संतापासून साहित्याची परंपरा आहे. तरीही अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. केरळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी तेथील लोक रस्त्यावर उतरले. त्यांना यश आले; मात्र आपल्याकडे साहित्य संमेलनात ठराव घेण्यापलीकडे कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याची खंतही यावेळी डॉ. सोनवणी यांनी व्यक्‍त केली. पुरस्कार वितरण ' मृत्युस्पर्श' या साहित्यकृतीसाठी डॉ. सतीशकुमार पाटील यांना, तर ' मी टेकले नाही हात अजून'साठी डॉ. शेख इकबाल मिन्ने, "श्रावणी इंद्रधनूचे झेले' यासाठी डॉ. प्रकाश धर्म यांना धोंडीराम माने लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दिनकर शिंदे (शेती), दीपक सूर्यवंशी (उद्योग) आणि गणेश कोंडावार (समाजसेवा) यांना गंगाबाई माने सामाजिक कृतज्ञता
पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासह सेवानिवृत्ती एससीपी गोवर्धन कोळेकर, प्रा. डॉ. डी. एन. शेळके, उपजिल्हाधिकारी मनीषा राशिनकर, ऍड. विजय राऊत यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. संमेलनात छत्रपती शंभुराजे हे अॅड. कमलाकार साबळे यांचे एकपात्री अभिनयाचे सादरीकरण झाले. सुभाष बोंद्रे व अमृता अलदर यांनी सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com