गुरू गाेविंदसिंग यांची पगडी, चादर, खडाव, तवा औरंगाबादेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

दरम्यान गुरूगाेबिंदसिंग यांच्या ३५३ व्या जयंतीनिमित्त धावणीमाेहल्ला, उस्मानपुरा, सिंधी कॉलनी गुरूद्वारा येथे अरदास, लंगरचे व सायंकाळी धावणीमाेहल्ला ते सिंधी कॉलनी अशी शाेभायात्रा काढण्यात आली.

औरंगाबाद : शिखांचे दहावे गुरू गुरू गाेविंदसिंग यांनी प्रत्यक्ष वापरलेली पगडी, तवा, खडाव, चादरीचे हजाराे भाविकांनी दर्शन घेतले. गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त धावणी माेहल्ला येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरूद्वारा येथे या पवित्र वस्तू आणण्यात आल्या होत्या. 

पंजाबमधील भटिंडा जिल्हा येथील चक्क फत्तेसिंगवाला परिसरातील गुरूद्वारा बुरजसाहिब माईदेसा धन धन माता देसा येथून सेवादार भाई मनदीपसिंग यांचे अहमदनगर मार्गे धावणी माेहल्ला गुरूद्वारा येथे या पवित्र साहित्यासह आगमन झाले. 

Image may contain: text that says "ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦੀ REDMI NOTE PRO ਪਵਿੱਤਰ ਦਸਤਾਰ MI DUAL CAMERA OF GURU GOBIND SINGH JI 2020/1/2 15:28"
गुरू गाेबिंदसिंग यांच्यासाठी माईदेसाजी यांनी तयार केलेली पगडी

काचेच्या पेटीत ठेवलेल्या या वस्तूंमध्ये दहावे गुरू गाेबिंदसिंग यांच्यासाठी माईदेसाजी यांनी तयार केलेली पगडी ( गुरूकी दस्तार), महेलका खडाव, माई की चादर, गुरूंनी वापरलेला तवा या ऐतिहासिक, धार्मिक वस्तू होत्या. 

या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी शिख, सिंधी, हिंदू समाजबांधवांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांना गुरूद्वारा येथील गुरु ग्रंथ साहिबनंतर या अनमोल वस्तूंचे दर्शन झाले. 

Image may contain: flower
गुरूंनी वापरलेला तवा

यावेळी सचिव तसरदार हरिसिंग काचवाले, रणजितसिंग गुलाटी, अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, सचिव आदेशपालसिंग छाबडा, मनिंदरसिंग पन्नू, अमरजितसिंग काेहली, हरविंदरसिंग धिंग्रा, सुरेंद्रसिंग साबरवाल, सरबज्याेतसिंग काेहली, हरविंदरसिंग सलुजा, हरदेवसिंग मुच्छल, प्रितमसिंग छाबडा, भूपेंदरसिंग राजपाल, परविंदरसिंग काैशल, सुरेंद्रसिंग ग्रंथी यांच्यासह तिन्ही गुरूद्वारा येथील पदाधिकारी उपस्थित हाेते. 

माईदेसाजी निस्सीम भक्त 

माईदेसाजी या गुरूगाेबिंदसिंग यांच्या निस्सीम भक्त हाेत. त्यांनी श्रद्धेने गुरूंसाठी हीच चादर विणली हाेती, चक फतेसिंग (भटिंडा) येथे गुरूंनी त्याचा स्वीकार व वापर केला हाेता. भाई जसविंदरसिंग हे त्यांचेच (माईदेसाजी) वंशज असून, त्यांनी या पवित्र वस्तू औरंगाबाद येथे आणल्या हाेत्या.

Image may contain: 3 people, indoor
दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दिवसभर लंगर, अरदास

दरम्यान गुरूगाेबिंदसिंग यांच्या ३५३ व्या जयंतीनिमित्त धावणीमाेहल्ला, उस्मानपुरा, सिंधी कॉलनी गुरूद्वारा येथे अरदास, लंगरचे व सायंकाळी धावणीमाेहल्ला ते सिंधी कॉलनी अशी शाेभायात्रा काढण्यात आली. यात भटिंडा येथील बॅण्डपथकाने भाविकांची मने जिंकली, यासह चाऊस बॅण्डपथकानेही सुरेख धून सादर केल्या. नांदेड येथील सचखंड श्री हुजूर साहिब येथील रमेश राठाेड, पुंडलिक व संजय यांनी खास आणलेले घाेडे मिरवणुकीत आकर्षक ठरले.

हेही वाचा - मुलांमध्ये वारकरी संस्कार रुजवणारे गाव कोणते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guru Gobind Sing Jayanti Aurangabad news