esakal | हार्वेस्टरच्या बॅटऱ्यांची चोरी, चोरट्यांनी अंधाराचा उचलला फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथील भाग्य लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या  स्पेअर पार्टच्या दुकानासमोर उभा असणाऱ्या तूर, गहू सोंगणीच्या दोन हार्वेस्टरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१) मध्यरात्री घडली.

हार्वेस्टरच्या बॅटऱ्यांची चोरी, चोरट्यांनी अंधाराचा उचलला फायदा

sakal_logo
By
दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथील भाग्य लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या  स्पेअर पार्टच्या दुकानासमोर उभा असणाऱ्या तूर, गहू सोंगणीच्या दोन हार्वेस्टरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१) मध्यरात्री घडली. सध्या तूर सोंगणीचे काम सुरू असल्याने काम संपल्यावर सायंकाळी रोजच्या प्रमाणे हार्वेस्टर चालकांनी चित्तेपिंपळगाव येथे असलेल्या भाग्य लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या दुकानासमोर हार्वेस्टर आणून उभे केले होते. मात्र चोरट्यांनी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत या हार्वेस्टरच्या बॅटऱ्या चोरून नेल्या.

याचं ठिकाणाहून तीस डिसेंबर रोजी, हार्वेस्टर चालकाच्या जवळील  दोन बॅग चोरी गेल्या होत्या. या बॅगमधून रोख पंचवीस हजार रुपये व मोबाईल चोरी गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी याचं ठिकाणाहून येथे उभे असलेल्या तीन हार्वेस्टर पैकी दोन हार्वेस्टरच्या साठ हजार रुपये किंमतीच्या चार बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्त्यावरून या बॅटरी चोरी गेल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाकच नसल्याने यावरून दिसून येत आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मुख्य महामार्गावरील पुलाचे लाईट बंद
चित्तेपिंपळगाव येथील पुलावरील व सर्व्हिस रस्त्याचे लाईट गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे.  यामुळे या पुलावर रोज छोटे-मोठे अपघात होतं आहे, तर सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्री या ठिकाणी कुणीही नसते. वाहने पुलावरून जातं असल्याने बस स्टॉपवर  चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. संबंधित महामार्ग कंत्राटदाराने दोन महिन्यांपासून बंद असलेले वीज सुरू करावे, अशी मागणी येथील व्यापारी व दुकान चालक करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar