घराच्या सुरक्षेसाठी आता हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

Home Hi Tech Security System
Home Hi Tech Security System

औरंगाबाद: आपले घर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. आता घराची सुरक्षिता अधिक मजबूत करण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. आधुनिक एचडी-आयपी सीसीटीव्ही, वायलेस कॅमेरापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा लॉक डोअरचा वापर केला जात आहे. एवढे नव्हे तर वीज, पाणी आणि किचनमधील उपकरणेही आता एका क्‍लिकवर चालू किंवा बंद करणारे सेन्सरचाही वापर औरंगाबादेत होऊ लागला आहे. घर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित केले जात आहे. 


घराच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने हायटेक सीसीटीव्ही, ऍक्‍सेस कंट्रोल सिस्टिम, पासवर्ड लॉक, कंपाऊंड वॉलसेन्सर अशी विविध आधुनिक यंत्रणा वाजवी दरात बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. कोणी नसताना घरात शिरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी ऍक्‍सेस कंट्रोल सिस्टिम आली आहे. अज्ञात व्यक्तीने दार उघडण्याचा प्रयत्न केला तर सायरन वाजतो. फिंगरप्रिंट लॉक, फेसरीडिंग लॉकची सोय असून, कंपाऊड वॉल सेन्सर आहे. पासवर्ड आणि फिंगरप्रिंटशिवाय दार उघडणार नाही, अशी यंत्रणा आहे. काच, फायबर, लोखंड, लाकडावर लॉक बसवता येतात. 


हे लावा कॅमेरे 
घराच्या सुरक्षेसाठी प्रमुख गोष्ट म्हणजे सीसीटीव्ही. यात आधुनिक व एचडी असलेल्या कॅमेऱ्याच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आल्या आहेत. पूर्वीच्या कॅमेऱ्यांची क्षमता कमी होती. आता आयपी कॅमेरा, वायरलेस कॅमेरा, पीटी झेड या प्रकारांतील कॅमेरा आले असून, तो थेट आपल्या मोबाईलला कनेक्‍ट झालेला असतो. आपण कुठेही असलो तरी आपण तेथून आपल्या घरावर लक्ष ठेवू शकतो. 

फेसरीडिंग सिस्टिम 

कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्याचा रेटिना आणि हाडांची संरचना फेसरीडिंग सिस्टिममध्ये लोड करता येते. दरवाजावर लावल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीशिवाय अज्ञाताने डोकावताच त्याचे छायाचित्र इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवरही पाहता येते. घरातील व्यक्‍तीचे फेसरीडिंग केलेली असते. तसेच यात आपण कितीही लोकांचा चेहरा रीडिंग करू शकतो. हजारो व्यक्तींचा डाटा यात लोड होऊ शकते एवढी यांची क्षमता असते. या उपकरणांची किमत सात हजारांपासून सुरू होते. अज्ञात व्यक्तीला घरात प्रवेश द्यावयाचा असेल तर मोबाईल, इंटरनेटद्वारे मेसेज पाठवून दार उघडण्याची सुविधा यामध्ये आहे. 


"इन्फ्रारेड बॅरिअर' सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण 

आपल्या घराच्या सुरक्षेसाठी वाहनाचा तसेच 15 ते 160 मीटरपर्यंतच्या कंपाऊंड वॉलवर सेन्सर्स बसवता येते. कंपाऊंड वॉलवरून कुणी उडी मारून आत येण्याचा प्रयत्न केल्यास सेन्सरचे इन्फ्रारेड बिम वाजतो. या यंत्रणाचाही शहरात काही प्रमाणात वापर होत आहे. त्याची किमत 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत आहे. 
हेही वाचा -का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

विजेसाठी सेन्सर 
मोठमोठ्या हॉटेलमध्ये दरवाजा आणि विंडो हे सेन्सरवर असतात. तशाच प्रकारे आता घरातील विजेचे दिवे, वॉशरूममधील इलेक्‍टॉनिक्‍स उपकरणे हे सेन्सरच्या माध्यमातून हाताळत चालू किंवा बंद करतात. याचा वापर शहरात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हजार ते 1,200 रुपयांत ही सेन्सर उपलब्ध आहे. यासह अलार्म यांचाही वापर होत आहेत. यापुढे सोसायटी, तसेच मध्यमवर्गीयही या सेन्सरचा वापर करू लागल्याची माहिती चंद्रशेखर चौधरी यांनी दिली. 

सुरक्षेसाठी ऍपचा वापर 
पुण्यातील पिंपरी भागात एका सोसायटीने चोरी रोखण्यासाठी मोबाईल ऍप बनविले आहे. या ऍपच्या माध्यमातून सोसायटीत पार्सल घेऊन येणाऱ्यापासून ते भेटायला येणाऱ्याची अचूक माहिती डाटा ठेवण्यासाठी ऍप बनविले आहे. या ऍपमध्ये येणाऱ्यांची माहिती नोंद केली जाते. त्यानंतर ते ज्यांना भेटायचे आहेत, त्या संबंधिताना मेसेज जातो. त्यांचा रिप्लाय आल्यानंतर सुरक्षारक्षक बाहेरून सोसायटीत येणाऱ्यांना आत सोडतो, अशा प्रकारे विविध ऍपच्या माध्यमातूनही घराची सुरक्षितता वाढवली जात आहे. 
 

घराच्या सुरक्षेसाठी लागणारी हायटेक प्रणाली यामध्ये सीसीटीव्ही, सेन्सर, लॉक ही 20 हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सीसीटीव्हीपासून ते सर्व सुरक्षेच्या दृष्टीने लागणाऱ्या साहित्यातील नव्या तंत्रज्ञान आल्यामुळे पूर्वीपेक्षा किमती कमी झाल्या आहेत. याच्या बाजारपेठाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पूर्वी चीन, युरोपीय कंपन्यांचे साहित्य होते. आजही आहे; मात्र यात भारतीय कंपन्याही उतरल्या आहेत. यामुळे सुरक्षेच्या उपकरणाच्या उलाढाली वाढल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या घराची सुरक्षा महत्त्वाची असल्याने जो तो आपापल्या परीने हायटेक सुरक्षा यंत्राचा वापर करू लागला आहे. 
- चंद्रशेखर श्रीराम चौधरी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर टेडर्स, औरंगाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com