वातानकूलित दालनातील महसूल यंत्रणा भर उन्हात रस्त्यावर

दुर्गादास रणनवरे 
Saturday, 16 May 2020

औरंगाबादमधील मुकुंदवाडीतील हॉटस्पॉट भागाला अधिकाऱ्यांच्या भेटी 

औरंगाबाद : संजयनगर मुकुंदवाडी परिसरातील कोरोनाबधित हॉटस्पॉट भागातील वसाहतींना शनिवारी (ता. १६) विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपआयुक्त शिवाजी शिंदे यांनी पथकासह भेट देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

शहर व जिल्ह्यात कोरोनाकंप सुरू असताना महसूल यंत्रणा मात्र हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेत असल्याची टीका झाली. ‘सकाळ’ने यावर वारंवार प्रकाशझोत टाकला होता.  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह आता महसूल यंत्रणाही कामाला लागल्याने कोरोनाकंप निश्चितच कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महसूल उप आयुक्तांनी यावेळी महसूल तसेच आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा तसेच महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती करून घेतली. 
  
तलाठ्याकडून घेतली माहिती 
वसाहतीमधील नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या. शिंदे यांनी या भागाची माहिती जाणून घेण्यासाठी स्थानिक तलाठी विशाल मगरे व यंत्रणेला सोबत घेऊन हॉटस्पॉट भागातील प्रत्येक गल्लीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांच्या सोबत उप विभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, नायब तहसीलदार श्री. सुरे, तलाठी विशाल मगरे, पोलिस यंत्रणा तसेच आशा सेविका व महापालिकेचे कर्मचारीही यावेळी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणीच्यावेळी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी स्थानिक कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले घरे व एरिया श्री. शिंदे यांच्या पथकाला दाखविला. आवश्यक ती खबरदारी घेण्याची तसेच काही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

 असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

कंन्टेनमेंट झोनमधून वाढले  ८० टक्के रुग्ण
गल्ल्यांमध्ये नागरिकांचे एकमेकांच्या घरात जाणे-येणे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच भागात रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहता १२ कंन्टेनमेंट झोनमधून ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. संजयनगर मुकुंदवाडी येथील एका वाड्यात तब्बल ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

काल दिवसभरात 77 जण कोरोनामुक्त 
काल दिवसभरात घाटी रुग्णालयातील एकूण 10 जण कोविड-१९ तून बरे झाले. यात आठ जण किलेअर्क, एक जण उस्मानपुरा, आणि एक रुग्ण दौलताबाद यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातून १७ रुग्णांशिवाय आणखी १० जण कोरोनातून बरे झाले. यात जयभीमनगर येथील दोन पुरुष, जोन महिला, चार अल्पवयीन मुलींना सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ४० जणांना सुटी झाली, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hot Spot Inspections at Aurangabad