उंचे लोग, उंची पसंत... औरंगाबादेत व्हीआयपी रुग्णांना मिळणार ही सुविधा

corona
corona

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येपाठोपाठ क्वारंटाइन व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र अनेक सधन व्यक्ती आम्हाला घरीच ठेवा किंवा एखाद्या हॉटेलमध्ये व्यवस्था करा, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने पैसे भरा आणि हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हा, अशी ऑफर दिली आहे. त्यासाठी शहरातील चार हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने शहरातील अनेक सरकारी कार्यालये, खासगी संस्थांची वसतिगृहे ताब्यात घेऊन त्याठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहेत. सध्या १६ ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना या ठिकाणी ठेवले जाते. स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला तर क्वारंटाइन केलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जाण्यास मध्यमवर्गीयाची तक्रार नसते; मात्र अनेक श्रीमंतांनासुद्धा हा आजार होत आहे. त्यांची साध्या पद्धतीचे असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये राहण्याची इच्छा नसते; मात्र महापालिका त्यांना बळजबरीने याठिकणी ठेवत होती. फक्त मेनॉर हे एकमेव हॉटेल व्हीआयपींसीठी म्हणजे परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. आता मात्र व्हीआयपींसाठी चार हॉटेल्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 

याठिकाणी आहे व्यवस्था 
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले, की अनेक जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन होण्यासाठी हॉटेल्सची मागणी करीत आहेत. ज्या व्यक्ती हॉटेलचे भाडे भरू शकतात त्यांना महापालिकेने मेनॉर, सहारा, अमरप्रित आणि औरंगाबाद जिमखाना या चार हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी या हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हावे; मात्र हॉटेलचे भाडे त्यांनी भरावे. हॉटेलकडूनच डॉक्टर आणि स्टाफची व्यवस्था केली जाईल.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com