विशेष : औरंगाबादचे मोर्चे शांततेत का झाले?

शेखलाल शेख
Saturday, 28 December 2019

सर्व जाती, धर्मातील लोकांनी याविरुद्ध रस्त्यावर उतरले पाहिजे. लोकांचा आवाज रस्त्यावर दिसला पाहिजे. जे पक्ष स्वतःला सेक्‍युलर म्हणून घेता त्यांनी मनाने सेक्‍युलर होण्याची आवश्‍यकता आहे. आपण जर डोळे मिटुन चाललो तर आपल्याला ठेचाच लागतील, असे ते म्हणाले. 

नागरीकत्व सुधारण कायदा संदेत पारित झाल्यापासून पुर्वोत्तर राज्यात हिंसक आंदोलने झाली. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर तर याचे लोण अनेक विद्यापीठात पोहचले. नागरीकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी यांचा परस्पर संबंध लावला जात आहे. तर दुसरीकडे एनआरसीच्या विरोधात ही आंदोलन होताहेत. याला महाराष्ट्र सुद्धा अपवाद नाही.

मराठवाड्यात शहरासह, तालुका, गाव पातळीवर सुद्धा शांतीपुर्ण आंदोलने झाले. या आंदोलनात औरंगाबाद ही मागे नव्हते. सीएए-एनआरसीच्या विरोधात जसे मोर्च निघाले तसा समर्थनार्थ सुद्धा मोर्चा निघाला. 27 डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी सीएए-एनआरसी विरोधी कृती समितीर्फे औरंगाबाद शहरात आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत महामोर्चा काढला.

Image may contain: one or more people, crowd, stadium and outdoor

या अगोदर 20 डिसेंबर रोजी सुद्धा मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन- एमआयएम पक्षातर्फे आझाद चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लाखांच्या जवळपास लोक होते, मात्र मोर्चे हे शांतीपुर्ण राहिले. विशेष म्हणजे यामध्ये तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली.

नागरीकत्व सुधारण कायद्याबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नव्हती. मात्र नागरीकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी यांचा परस्परांशी कसा संबंध आहे ते सांगितल्यानंतर अनेक जण रस्त्यावर उतरले. यामध्ये मुस्लिम समाजासोबत इतर धर्मियांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.

आपले नागरीकत्व हिरावुन घेऊन देशातील अस्तित्व धोक्‍यात आणण्याचा हा छुपा डाव असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यातून रस्त्यावर हा आक्रोश दिसतो. आंदोलनात एक गोष्ट प्रखरपणे जाणवते ती म्हणजे हातातील तिरंगी झेंडे, महापुरुषांचे फोटो आणि विविध घोषणा असलेले फलक. मुस्लिम समाजातील ज्या महिला कधी बाहेर पडत नव्हत्या. त्यासुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या. हे औरंगाबाद शहरात निघालेल्या दोन्ही मोर्चातून स्पष्टपणे दिसते. विशेषतः मुस्लिम समाजातील तरुणांची संख्या या आंदोलनात लक्षणीय आहे.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चाला जवळपास 40 पेक्षा जास्त पक्ष संघटनांनी पाठींबा दिला होता. दुपारनंतर औरंगाबाद शहरातील हजारो नागरीक या मोर्चात सहभागी झाले होते. मंचावर सर्व पक्ष संघटनांचे नेतेही होते. या नेत्यांच्या भाषणाला प्रतिसाद देत तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते खासदार मनोज झा, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणाला तरुणांनी डोक्‍यावर घेतले.

Image may contain: 2 people, crowd, hat and outdoor

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले भाषण सर्वजण अतिशय काळजीपुर्वक ऐकत होते. आंबेडकर म्हणाले की, ही लढाई खुप मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा दोन्ही म्हणतात एनआरसीवर चर्चा झाली नाही. चर्चा झाली नाही. एनआरसी लागु करायची नसेल तर मग डिटेंशन कॅम्प कशासाठी बांधले जात आहेत. खारघर मधील डिटेंशन कॅम्पसाठी जी जागा निवडली, तेथे पाच लाख लोकांना ठेवले जाऊ शकते. 

तत्कालीन सरकारने ही जागा निवडली होती. सीएए, एनआरसी हा कायदा मुस्लीम विरोधी आहे हे सत्य असले तरी याचे 40 टक्के हिंदु बांधव शिकार होतील. हे मी कालच मुंबईला सांगितले होते. हा कायदा मुस्लिम-हिंदु विरोधाशिवाय संविधान विरोधी सुद्धा आहे. आम्हाला आता कोर्टात आशेने पाहता येणार नाही. कोर्टात जाणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे, असेही आंबेडकर म्हणाले. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

ही लढाई खुप लांब आहे जी 2024 पर्यंत चालेल. आता सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे. सर्व जाती, धर्मातील लोकांनी याविरुद्ध रस्त्यावर उतरले पाहिजे. लोकांचा आवाज रस्त्यावर दिसला पाहिजे. जे पक्ष स्वतःला सेक्‍युलर म्हणून घेता त्यांनी मनाने सेक्‍युलर होण्याची आवश्‍यकता आहे. आपण जर डोळे मिटुन चाललो तर आपल्याला ठेचाच लागतील. सर्वांना सोबत घेऊन आरएसस, भाजपला पराभुत करुन संविधानाला जिवंत ठेवण्याची ही लढाई आहे, हे सांगायला ते विसरले नाहीत. 

Image may contain: 15 people, people standing

बिहारमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते मनोज झा यांचे सुद्धा भाषण खुप आक्रमक होते. ते म्हणाले, या देशाच्या मातीशी प्रेम करणाऱ्यांसाठी ही आरपारची लढाई आहे. आता तुम्हाला नागरीकत्व कायदा परत घ्यावाच लागेल. तुम्ही काय आम्हाला आमच्या कपड्यांवर ओळखणार तुम्हाला आम्ही तुमच्या चरित्रांवरुन ओळखतो. तुम्ही अनेक कायदे केले आम्ही शांत राहिले मात्र संविधाना तोडण्यारा कायदा केल्यावर आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

आम्ही आमचे दुःख घेऊन रस्त्यावर आहोत. आता देशाचे संविधान तुमच्या हातात सुरक्षित नाही. तुमची दृष्टी संकुचित, खुपच छोटी आहे, तुमची विचारधारा सुद्धा संकुचित आहे. सीएए, एनआरसीविरुद्धची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. संविधानासाठी आम्ही रक्त सुद्धा सांडायला तयार आहोत. त्यांचा प्रयत्न आहे आंदोलन हिंसक व्हावे मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने लढाई लढु. तुम्ही जर कागदपत्रे मागायला आला तर आम्ही तुम्हाला तिरंगा दाखवु तोच आमचा सर्वात मोठा कागद आहे. आज सुद्धा वेळ गेली नाही त्यामुळे हा कायदा परत घ्यावा. आम्ही हा देश इस्त्राईल होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

जितेंद्र आव्हाड या मोर्चात उशीराने पोहचले. मात्र त्यांना ऐकण्यासाठी सर्वजण येथे शेवटपर्यंत उपस्थित राहिले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, हा देश कुणाच्या बापाचा नाही. आज मुस्लिमाकडे संशयाने बघण्याची गरज नाही. कितीतरी हिंदूंकडेही पुरावे सापडणार नाहीत. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडते; मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी इंग्रजांना जसे बिगर हत्याराने पळविले तसेच तुम्हालाही पळवू, या लढाईमध्ये राम आणि रहिम यांना एकत्र येत याविरुद्ध लढावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Image may contain: one or more people, sky and outdoor

समर्थनार्थ आणि विरोधात ही मोर्च निघत आहे. प्रत्येक जण आपआपली बाजू मांडतोय. पोलिस प्रशासन अतिशय व्यवस्थित परिस्थिती हाताळत आहे. समाजांचे नेतेही नागरिकांना शांततेत आंदोलनाचे महत्त्व पटवून देत आहेत. अजूनही मोर्चे निघतील, आंदोलने होतील. आता ही लढाई कुठपर्यंत जाईल, हे येणारा काळच सांगेल. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

Image may contain: one or more people, crowd and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Aurangabad Maintained Peace in Protest Against NRC