esakal | गरजवंतांच्या मदतीसाठी माणुसकीची भिंत! औरंगाबाद महापालिका सज्ज!   
sakal

बोलून बातमी शोधा

manuski bhint.jpg

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका करणार मदत 

गरजवंतांच्या मदतीसाठी माणुसकीची भिंत! औरंगाबाद महापालिका सज्ज!   

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : गरजवंतांना मदत करण्यासाठी महापालिकेने ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम सुरू केला होता. आता दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा हा उपक्रम राबविला जात आहे. अनेकांच्या घरात चांगल्या वस्तू वापराविना पडून असतात. त्या वस्तू इतरांची गरज भागवू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रभाग कार्यालयात माणुसकीची भिंत' म्हणजेच 'नको असलेले द्या, हवे असलेले घेऊन जा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

‘लव्ह औरंगाबाद' मोहिमेअंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आता प्रशासक आस्‍तिककुमार पांडेय यांनी शहरातील गोरगरीब, गरजवंतांना दिवाळीत मदत व्हावी यासाठी 'माणुसकीची भिंत' संकल्पना राबविली जात आहे. नागरिकांनी घरी अडगळीत पडलेल्या वस्तू योग्य गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी मदत करावे, असे आवाहन प्रशासकांनी केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टाऊन हॉल परिसरातील महानगरपालिका मुख्यालय परिसर, खोकडपुरा येथील उदय झेरॉक्सजवळ, शहागंज चमन परिसर, रोशन गेट, एन -११ मधील भाजी मार्केट, एसबीओए शाळेसमोरील गणपती मंदिर, मयूर पार्क, एन-१ येथील काळा गणपती मंदिर, एन-२ कम्युनिटी सेंटर, कामगार चौक, गारखेडा येथील रिलायन्स मॉल, शाहनूरवाडी येथे डी-मार्ट, उस्मानपुरा येथील कामगार चौकातील पीर बाजार आणि क्रांती चौकातील गोपाळ टी-सर्कल येथे वस्तू स्वीकारल्या जातील व गरवंतांना मदत मिळेल. घरातील न वापरण्यात येणारे कपडे, बूट, खेळणी, पुस्तके, फर्निचर अशा वस्तू नागरिक या ठिकाणी देऊ शकतात. गरजवंत स्वतः तेथे येऊन हवी असेल ती वस्तू घेऊन जाऊ शकतील असे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)